Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल उद्या

JEE-Main-Exam copyनवी दिल्ली, [२५ एप्रिल] – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (जेईई) मुख्य पेपर-१ आणि पेपर-२ चा निकाल बुधवार २७ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार असून, यामुळे या परीक्षेला बसलेल्या सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.
जेईईच्या मुख्य पेपर-१ व पेपर-२ ची ऑफलाईन परीक्षा ३ एप्रिल रोजी, तर पेपर-१ आणि पेपर-२ ची ऑनलाईन परीक्षा ९ व १० एप्रिल रोजी घेण्यात आली होती. जेईई मुख्य परीक्षा २०१६ ला बसलेले सर्व विद्यार्थी आपला निकाल बुधवारी jeemain.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर बघू शकतील. याशिवाय सीबीएसईच्या cbseresults.nic.in या संकेतस्थळावरही हा निकाल बघता येईल.
नोंदणी क्रमांक, नाव आणि जन्मतारीख ही आवश्यक माहिती सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या वेबसाईट्‌सवर आपली गुणपत्रिका आणि क्रमवारी बघता येईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27985

Posted by on Apr 26 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (442 of 2453 articles)


=मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला नवे वळण, कॉंगे्रस व संपुआ तोंडघशी= नवी दिल्ली, [२३ एप्रिल] - मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदू संघटनांचा हात असल्याचा ...

×