Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » जोडीदाराला अपमानास्पद वागणूक दिल्याने होतात घटस्फोट

जोडीदाराला अपमानास्पद वागणूक दिल्याने होतात घटस्फोट

The Adobe Image Library ©1998 Adobe Systems Incorporated Silhouette of man and woman fighting

लंडन, [६ फेब्रुवारी] – विवाहबंधनातील जोडीदार आजकाल एकमेकांशी मित्रत्वाचे नाते असल्याचे सांगताना आढळतात. त्यामुळे एकमेकांना अनेक बाबतीत गृहीत धरण्याबरोबरच मित्राशी ज्या सहजतेने बोलले, भांडले जाते तशीच वर्तणूक जोडीदाराशीही ते करतात. अशावेळी कित्येकदा एकमेकांचे उणेदुणे काढणे, अपमानास्पद बोलणे हे प्रकारही घडतात. मात्र यामुळे नाते फुलण्याऐवजी कोमेजतच चालले असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
घटस्फोट घेण्यामागे जोडीदाराला अपमानास्पद वागणूक देणे हे प्रमुख कारण असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ जॉन गोटमॅन आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील रॉर्बर्ट लेवेसन यांनी घटस्फोटाच्या कारणांचा सखोल अभ्यास केला आहे. याकरिता त्यांनी सुमारे ७९ नवविवाहितांचा सलग १४ वर्षे विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला.
फसवणुकीपेक्षाही जोडीदाराकडून होत असलेल्या अपमानाचा गंभीर परिणाम दाम्पत्यांच्या विवाहित जीवनावर होत असल्याचे यात दिसून आले. ताणतणाव किंवा नकारात्मक विचारांपेक्षा राग आणि किळस या भावनाच अधिक भयानक असून विभक्त होण्यामागे या भावनांची चालना अधिक जोमाने काम करते असे दिसले. जोडीदाराने आपल्याला समान समजण्याऐवजी कमी लेखण्याची भावना विवाहितांना अपमानास्पद वाटते. पुरुष वा स्त्री कोणीही आपल्या जोडीदाराला सतत अपमानास्पद वागणूक देत असेल तर त्याची परिणिती घटस्फोटातही होऊ शकते. त्यामुळेच जर दीर्घकाळ सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल तर अवमान झटकून सकारात्मक विचार रुजविण्याची गरज असल्याचा निष्कर्षही संशोधनातून मांडण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26742

Posted by on Feb 7 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (858 of 2458 articles)


=कॅन्सर, एड्‌सवरील उपचार महागणार= नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] - कर्करोग आणि एचआयव्ही/एड्‌सवरील औषधांसह एकूण ७४ औषधांच्या आयातीवरील अबकारी सवलत सरकारने ...

×