Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

atmaram bhendeपुणे, [७ फेब्रुवारी] – गेले पाऊण शतक आपल्या सहज अभिनयाने रसिकांना निखळ आनंद देणारे ज्येष्ठ अभिनेते आणि नाशिक नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे यांचे येथील रत्ना हॉस्पिटलमध्ये शनिवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचा पडदा बेळगावमध्ये पडत असतानाच भेंडे यांचे निधन तमाम नाट्य कलावंतांच्या मनाला चटका लावून गेले. यामुळे संमेलनावर दु:खाचे सावट पसरले आहे.
चित्रविचित्र अंगविक्षेप न करता हसविण्यासाठी तर चेहर्‍यावरचे हावभाव, शब्दफेक आणि समयसूचकता साधून उत्तम विनोदनिर्मिती करता येऊ शकते, हे भेंडे यांनी दाखवून दिले. रंगभूमी अभिनयासोबतच चित्रपट, जाहिराती आणि मालिकांमध्येही त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. दिग्दर्शक आणि निर्माता ही जबाबदारीदेखील त्यांनी समर्थपणे पेलली. अलीकडच्या काळात त्यांच्या चरित्र भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या. कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भेंडेंना नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. १९६०-७० च्या दशकात लेखक बबन प्रभू आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे या जोडीने मराठी रंगभूमीला फार्सिकल नाटकांची ओळख करून दिली. १९८१ मध्ये नाशिकला झालेल्या ६१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भेंडेंनी भूषविले होते.
आत्माराम भेंडेचा अल्पपरिचय ….
जन्म – ७ मे १९२३
शिक्षण – इंजीनिअरींग, व्ही. जे. टी. आय १९४५
नाट्यक्षेत्रामधील कार्य – बाल नाट्यासह ७० हून अधिक नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन
१९४० ते १९५० या कालावधीत मराठी नाट्यभूमीला उतरती कळा लागली असताना, भेंडे यांनी नाटकांमध्ये प्रायोगिकता जपत नाटक व नाट्यकलावंतांना उभारी दिली. मराठी रसिकांना फार्सिकल नाटकाची ओळख करून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भेंडे यांनी मराठी नाट्यपरिषदेचे सहसचिव पद भूषविले.
– गेल्या ५५ वर्षांपासून आकाशवाणीवरील नाटकांमध्ये सहभाग तसेच आकाशवाणीवर अनेक नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन, दूरचित्रवाणीवर लोकप्रिय कलाकार म्हणून मान्यता, यात्रा, चुनौती या हिंदी मालिकांमध्ये काम, स्पर्श या टेलिफिल्मचे दिग्दर्शन, आव्हान या मराठी मालिकेत महत्त्वाची भूमिका, मराठी साहित्यातील ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवर आधारित रातराणी या मालिकेचे दिग्दर्शन
– १८ मराठी चित्रपटांमध्ये व एका हिंदी चित्रपटात काम केले. तसेच विविध माहिती व शैक्षणिक माहितीपटांमध्येही काम केले. भेंडे यांनी नाट्यलेखनही केले. थ्रोनटोन वाईल्डर यांच्या अवर टाऊन आणि मॅचमेकर या इंग्रजी नाटकांचा मराठीत अनुवाद केला. वृत्तपत्रे व मासिकांमध्ये नाट्यविषयक लेखन प्रसिद्ध
पुरस्कार
– उत्कृष्ठ विनोदी अभिनेत्यासाठी दिला जाणार्‍या नाट्यदर्पण पुरस्काराने १९७६ मध्ये सन्मानित
– जानेवारी १९८१च्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड
– १९८९ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्यावतीने मराठी नाटकातील अभिनय व दिग्दर्शनातील योगदानासाठी विशेष गौरव
– नाट्यक्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीकरिता १९८९ मध्ये अखिल महाराष्ट्र मराठी नाट्य विद्यामंदिराकडून विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित
– १९९६ मध्ये नटसम्राट नानासाहेब फाटक पुरस्काराने सन्मानित
– २००३ मध्ये अल्फा गौरवचा जीवनगौरव पुरस्कार

Short URL: https://vrittabharati.in/?p=20384

Posted by on Feb 8 2015. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (2097 of 2451 articles)


=टोलमुक्त महाराष्ट्र होणारच : मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार= मुंबई, [७ फेब्रुवारी] - कॉंगे्रस आघाडीची सलग १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणून ...

×