Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ट्विटरने बंद केले हाफिजचे अकाऊंट

ट्विटरने बंद केले हाफिजचे अकाऊंट

Hafiz_Saeedनवी दिल्ली, [१७ जुलै] – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आपल्या ट्विटर अकाऊंटचा वापर प्रक्षोभक भाषणे आणि समाजात जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्विटर या जगातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या सोशल नेटवर्किंग साईटने हफिजचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे.
हाफिज सईद ट्विटर अकाऊंटचा वापर भारतविरोधी जिहाद पुकारण्यासाठी करीत आहे, अशी चिंता भारतीय सुरक्षा संस्थांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचीही ट्विटरने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, या सोशल नेटवर्किंग साईटने यापूर्वीही हाफिज सईदचे एक ट्विटर अकाऊंट बंद केले होते. यानंतर हाफिजने नवे अकाऊंट सुरू केले होते. आता ते देखील बंद करण्यात आले आहे. दहशतवादी कारवायांवर आळा घालण्यासाठी ट्विटरने या वर्षी सुमारे सव्वा लाख ट्विटर अकाऊंट बंद केले आहेत.
जगभरात दहशतवादी संघटनांच्या सुरू असलेल्या कारवाया आमच्यासाठी चिंतेचा विषय असून, दहशतवादी कारवायांसाठी ट्विटरचा आधार घेण्याच्या वाढत्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारच्या हिंसक कारवाया करणार्‍यांसाठी आमची सेवा नसल्याचे ट्विटरने आपल्या ब्लॉगवर नमूद केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29124

Posted by on Jul 18 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (148 of 2458 articles)


हैदराबाद, [१६ जुलै] - एनआयएने अटक केलेल्या इसिसच्या पाच संशयित अतिरेक्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची घोषणा करणारे एमआयएमचे नेते ...

×