Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ठोस मुद्दे नसल्याने काँग्रेसमध्ये नैराश्य

ठोस मुद्दे नसल्याने काँग्रेसमध्ये नैराश्य

=भाजपाचा जबरदस्त प्रतिहल्ला=
Venkaiah-Naidu_3नवी दिल्ली, [१७ मार्च] – कॉंग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. लोकसभेत या पक्षाचे बोटावर मोजण्याइतके सदस्य आहेत. त्यातच त्यांच्याकडे सरकारविरोधात एकही ठोस मुद्दा नसल्याने पक्षनेत्यांना नैराश्य आले आहे. अशा स्थितीत संसदेत निव्वळ बसून राहण्यापेक्षा आपला जास्तीतजास्त वेळ बाहेर कसा जाईल, या प्रयत्नात हा पक्ष आहे आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्या न झालेल्या हेरगिरीच्या मुद्यावरून पक्षाचे नेते अनावश्यक गोंधळ घालत आहेत, असा जबरदस्त प्रतिहल्ला भारतीय जनता पार्टीने आज मंगळवारी केला.
भाजपा संसदीय मंडळाची आज सकाळी बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले की, अवघ्या १० महिन्यांच्या काळात भाजपाप्रणीत रालोआ सरकारने लोकांशी निगडित भरपूर कामे केली असल्याने सरकारला धारेवर धरता येईल, असा एकही मुद्दा कॉंग्रेसकडे राहिलेला नाही. त्यामुळे निराश होऊन त्यांचे नेते अनावश्यक मुद्यांचा आधार घेत आहेत.
राहुल गांधी यांच्या सुरक्षेची पारदर्शक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच पोलिसांनी त्यांच्याबाबतची सविस्तर माहिती मागविली होती. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथसिंह आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडूनही पोलिसांनी अशाच प्रकारचा फॉर्म भरून घेतला आहे, ही सत्यता समोर आल्यानंतर संसदेत कसे बसायचे, असा प्रश्‍न कॉंग्रेसला पडला आहे, असे सांगताना नायडू म्हणाले की, कोणत्याही मुद्यावर सभागृहात गोंधळ घालायचा आणि कामकाज रोखून धरायचे, हाच एकमेव कार्यक्रम पक्षाने हाती घेतला आहे. गेल्या शुक्रवारी लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना अर्थमंत्री जेटली सभागृहात नव्हते. असे असतानाही कॉंग्रेसने चर्चेच्या काळात गोंधळ घातला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21528

Posted by on Mar 18 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1892 of 2453 articles)


=मालदीवची प्रतिक्रिया= नवी दिल्ली, [१७ मार्च] - गेल्या आठवड्यात तीन देशांचा दौरा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला भेट दिली ...

×