Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » डाव्या संघटनांकडून विद्यार्थ्यांना धमक्या: अभाविप

डाव्या संघटनांकडून विद्यार्थ्यांना धमक्या: अभाविप

=हॉस्टेलमधील सामानही फेकले, उद्या पोलिस ठाण्याला घेराव=
abvpनवी दिल्ली, [५ मार्च] – दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील जे विद्यार्थी देशहिताबद्दल बोलत आहेत, त्यांना डाव्या विद्यार्थी संघटना धमक्या देत आहेत. एवढेच नव्हे तर या विद्यार्थ्यांचे सामानही हॉस्टेलबाहेर फेकत आहेत, असा आरोप अभाविपशी निगडित विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
जेएनयुचे महासचिव सौरभ शर्मा यांनी पत्रपरिषदेत हा आरोप लावताना म्हटले आहे की, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे नाव घेणारे हे डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी जेएनयुत राष्ट्रहिताचे विचार मांडणार्‍या विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत आहेत. त्यांना खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर डाव्या विचारसरणीचे काही प्राध्यापकही या धमक्या देणार्‍यांमध्ये सहभागी असल्यामुळे हे विद्यार्थी अतिशय भीतीच्या वातावरणाखाली आहेत, असा गंभीर आरोप शर्मा यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले की, कोयना हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचे सामान फेकून देण्यात आले आहे. स्कूल ऑफ सायन्सेसमधील विद्यार्थी तर कायम यांचे लक्ष्य आहेत. यांच्या या आधीच्याही कारवायांमुळे जेएनयुमधील ४० टक्के विद्यार्थी जेएनयुच्या निवडणुकीत मतदानही करीत नाहीत, याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले आहे. हे लोक केवळ लोकशाहीच्या गोष्टी करतात आणि आपले विचार दुसर्‍यांवर लादण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आम्ही म्हणू तसे वागा, आमच्या निर्णयाचे पालन करा, असा दबाव ते सतत आणत आहेत आणि यात डाव्या विचारसरणीचे काही प्राध्यापकही असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.
९ फेब्रुवारीला जेएनयुमध्ये जे काही घडले, ते दडपण्याचा काही प्राध्यापक प्रयत्न करीत आहेत. त्या दिवशी ज्या घोषणा देण्यात आल्या त्याबद्दल हे प्राध्यापक काहीही बोलत नाही. जेएनयु प्रशासनाने त्यावेळी जे काही झाले, ते सर्व रेकॉर्ड केले आहे. पण, त्याच्या चित्रफिती त्यांनी पोलिसांना दिलेल्या नाहीत. निवेदिता मोहन या मुलीने सर्रास सांगितले की, काश्मीरवर भारताने कब्जा केला आहे. पण, अशा लोकांवर अजूनही कारवाई झालेली नाही. आज जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा आहे, ही समाधानाची बाब आहे.
देशाच्या विरोधात घोषणा देणार्‍या सर्वांना अटक करण्यात यावी, राष्ट्रहिताचा विचार मांडणार्‍या ज्या विद्यार्थ्यांना धमकावले जात आहे, त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, यासह अन्य बाबींकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ७ मार्चपासून वसंतकुंज पोलिस ठाण्याचा घेराव करणार असल्याचा इशाराही पत्रपरिषदेत देण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27041

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (758 of 2452 articles)


तामिळनाडूत अण्णाद्रमुक, केरळात डावी आघाडी, बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस इंडिया टीव्ही सी-व्होटरचा निष्कर्ष नवी दिल्ली, [५ मार्च] - निवडणूक आयोगाने ...

×