Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » तरतुदीनुसार विभागांना मिळणार पूर्ण निधी

तरतुदीनुसार विभागांना मिळणार पूर्ण निधी

Mungantiwarमुंबई, [१८ एप्रिल] – सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात शेतकर्‍यांसाठी करण्यात आलेल्या आवश्यक तरतुदी शंभर टक्के पूर्णपणे संबंधित विभागांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भांडवली खर्च, जिल्हा योजना व स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के अर्थसंकल्पीय निधी विभागाला उपलब्ध करण्यात आला असून, उर्वरित योजनांतर्गत, योजनेतर निधी ८० टक्के उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार शेतकर्‍यांसाठी ज्या पूर्ण १०० टक्के तरतुदी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यात प्रामुख्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मंजुरी, साहित्य पुरवठा व प्रशासकीय खर्च या बाबींची केंद्र व राज्याच्या हिश्याची एकूण तरतूद ३२४३.६७ कोटी, मदत व पुनर्वसन विभागांतर्गत नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना पीक नुकसान भरपाई व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पूर, चक्रीवादळ इत्यादीमुळे हानी झाल्यास शेतकर्‍यांना पीक नुकसान भरपाई, घर दुरुस्ती, पशुधन खरेदी इत्यादीबाबतची एकूण तरतूद ५५७१.५४ कोटी, कृषी विभागांतर्गत पीक विमा निधी दाव्यापोटी देण्यात येणारी नुकसान भरपाई, सर्वंकष पिक विमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, हवामानावर आधारित फळ पिक विमा याबाबतची एकूण १८९१ कोटीची तरतूद या तरतुदींचा समावेश आहे.
वृक्षलागवडीसाठी सुद्धा शंभर टक्के निधी वनविभागाला उपलब्ध करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27875

Posted by on Apr 19 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (473 of 2451 articles)


=ताशी २०० किमीचा वेग, जून महिन्यात चाचणी= नवी दिल्ली, [१८ एप्रिल] - वेगाच्या बाबतीत गतिमान एक्सप्रेसवरही मात करणार्‍या टॅल्गो एक्सप्रेसची ...

×