Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » तालिबानी म्होरक्या मुल्ला मन्सूरचा खात्मा

तालिबानी म्होरक्या मुल्ला मन्सूरचा खात्मा

=अमेरिकेचा यशस्वी ड्रोन हल्ला=
mullah-akhtar-mansoor-talibaniवॉशिंग्टन/काबुल, [२२ मे] – पाकिस्तान-अफगाण सीमेवरील पाकच्या भूमीत लपून बसलेला अफगाण तालिबान या जहाल दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर आणि त्याचा खास साथीदार अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. तालिबान आणि अफगाण सरकारनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणमधील शांतता प्रक्रियेला गती देणारीच ही घडामोड असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
पाकच्या वायव्य सरहद्दीतील बलुचिस्तान प्रांतातील दुर्मिळ आदिवासी गावातून हे दोघेही मोटारीने जात असल्याचे अत्याधुनिक रडार यंत्रणेच्या माध्यमातून टिपल्यानंतर अमेरिकेच्या विशेष कृती दलाने या भागात एकामागोमाग अनेक क्षेपणास्त्र डागले. यातील एका क्षेपणास्त्राने दोघांचाही अचूक वेध घेतला, असा दावा अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला आहे. तालिबानी संघटनेच्या एका वरिष्ठ कमांडरनेही मुल्ला मन्सूर ठार झाला असल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. पाकच्या हद्दीतील अहमद वाल गावापासून दक्षिणेकडे हे ड्रोन हल्ले करण्यात आले.
मुल्ला अब्दुल रौफ असे नाव असलेल्या तालिबानी कमांडरने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, अमेरिकेच्या अचूक ड्रोन हल्ल्यात आमचा नेता ठार झाला आहे. तालिबानी प्रमुख मुल्ला उमर २०१३ मध्ये अमेरिकेच्या अशाच ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर मुल्ला अख्तर मन्सूरकडे संघटनेची सूत्रे सोपविण्यात आली होती. त्याला तालिबानमधील वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा होता. काबुलसह अफगाणच्या विविध शहरांमधील दहतशवादी हल्ल्यांमध्ये मन्सूरचा सक्रिय सहभाग असायचा.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28427

Posted by on May 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (293 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२२ मे] - माजी पोलिस अधिकारी आणि भाजपा नेत्या किरण बेदी यांना केंद्र सरकारने आज रविवारी पुद्दुचेरीच्या नायब ...

×