Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ‘त्या’ आर्थिक चमत्कारांचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे

‘त्या’ आर्थिक चमत्कारांचे उत्तर कॉंग्रेसने द्यावे

=प्रकाश जावडेकर यांची भूमिका=
prakash_javadekarनवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – यंग इंडिया प्रकरणी भाजपाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तर देण्याचे टाळत कॉंग्रेस सत्यापासून पळ काढत असल्याचा आरोप केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांनी आज शुक्रवारी येथे एका पत्रपरिषदेत केला.
यंग इंडिया प्रकरणी आपली बाजू मांडण्याऐवजी कॉंग्रेसने निकालात निघालेल्या ललित मोदी प्रकरणी सरकारवर पुन्हा आरोप केले, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, ललित मोदी प्रकरणात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करीत कॉंग्रेसच्या आरोपातील हवा काढून टाकली होती. त्यामुळे पुन्हा कॉंग्रेसने ललित मोदी प्रकरण उपस्थित करण्यात काहीच औचित्य नव्हते.
यंग इंडिया कंपनीने डोटेक्स मर्कडाईज कंपनीकडून एक कोटी रुपये कर्ज का घेतले, हा मूळ प्रश्‍न आहे आणि त्याचे उत्तर कॉंग्रेसने दिले पाहिजे, असे स्पष्ट करीत जावडेकर म्हणाले की, कॉंग्रेस आर्थिक बाबतीत असे काही जादूचे प्रयोग करते, की सर्व जण थक्क होऊन जातात. कॉंग्रेसने एक भूखंड एका व्यक्तीकडून ८ कोटी रुपयांत विकत घेतला. त्याचा धनादेशही त्या व्यक्तीला दिला. पण त्या व्यक्तीने तो धनादेश बँकेत जमा केला नाही. तीन महिन्यानंतर तोच भूखंड त्या व्यक्तीने ५८ कोटी रुपयांत विकत घेतला. काही न करता कॉंग्रेसला या प्रकरणात ५० कोटीचा फायदा झाला.
यंग इंडिया प्रकरणातही १ कोटीचे कर्ज वसूल करून देण्याच्या बदल्यात कॉंग्रेसला एका कंपनीचे ९० कोटी रुपयांचे शेअर देण्यात आले. त्यामुळे ती कंपनीच कॉंग्रेसच्या ताब्यात आली आणि त्या कंपनीच्या ५ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकी कॉंग्रेसला मिळाली, असा गौप्यस्फोट करीत जावडेकर यांनी असे जादूचे आर्थिक व्यवहार कॉंग्रेसला कसे जमतात, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.
कॉंग्रेस या प्रकरणी उत्तर देण्याऐवजी विषयांतर करीत असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला.
महागाईच्या मुद्यावर सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट करीत जावडेकर म्हणाले की, संपुआच्या काळात सर्व वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या असताना सरकार दखल घेत नव्हती. मात्र आमच्या काळात सर्व वस्तूंच्या किंमती नियंत्रणात असून, फक्त डाळीच्या किंमती कडाडल्या आहेत, पण आमच्या सरकारने त्यांची गंभीर दखल घेत, किमती कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. डाळीच्या किंमती कडाडण्यासाठी गेल्या दहा वर्षातील संपुआ सरकारचे आर्थिक धोरण जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25286

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1292 of 2453 articles)


डॉ. संबित पात्रा यांची मागणी नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] - कॉंग्रेसची प्रकाशन कंपनी असलेल्या यंग इंडियाच्या मुद्यावरून भाजपाने कॉंग्रेस अध्यक्ष ...

×