Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नद्या मुक्त करण्यासाठी भारताविरुद्ध जिहाद

नद्या मुक्त करण्यासाठी भारताविरुद्ध जिहाद

=हाफिझ सईदची दर्पोक्ती=
Hafiz_Saeedलाहोर, [२५ जून] – पाकिस्तानी नद्या मुक्त करण्यासाठी भारताताविरुद्ध जिहाद सुरू करणार आहे, अशी दर्पोक्ती लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख व २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदने केली आहे.
आमच्या नद्या मुक्त करण्यासाठी आम्ही भारताविरुद्ध जिहाद सुरू करणार आहे, असे हाफिझ सईदने शुक्रवारी पंजाब प्रांतातील सियालकोट येथे जमात-उद दावाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. अमेरिकेने हाफिझ सईदवर एक कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे, हे विशेष.
जम्मू-काश्मिरातील परिस्थिती आता बदलली असल्याचे फुटीरतावादी आसिया अद्राबीने मला सांगितले आहे. काश्मीरच्या स्वातंत्र्याबाबत बोलणारे आता कोठेही नसून, युवा नेतृत्व समोर आले आहे. यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी धार येईल, असेही अंद्राबीने सांगितल्याचे हाफिझ सईद यावेळी म्हणाला.
पाकिस्तानने अमेरिका, इराण आणि भारतासंबंधीच्या आपल्या धोरणात बदल करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरचे नुकसान करण्याचा प्रत्येक कट आम्ही हाणून पाडू, अशी घोषणाही हाफिझ सईदने यावेळी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28803

Posted by on Jun 26 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (179 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२५ जून] - ब्रिटनने युरोपियन समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण जगात अर्थकंप झाला. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा ...

×