Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नितीश कुमार पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम उमेदवार

नितीश कुमार पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम उमेदवार

=शरद पवारांची गुगली, राहुलपेक्षा सोनिया अधिक सक्षम=
SHARAD PAWARनवी दिल्ली, [२९ एप्रिल] – नितीशकुमार पंतप्रधानपदाचे सर्वात योग्य उमेदवार आहेत, असे राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शुक्रवारी स्पष्ट केले. सोबतच, त्यांनी राहुल गांधी यांच्यापेक्षाही सोनिया गांधी कितीतरी अधिक सक्षम नेत्या असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारण्याची पवारांची तयारी नाही, असेच हे संकेत मानले जात आहेत.
२०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना आता आणखीच वेग आला आहे. जदयुने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर केल्यानंतर त्यांना पाठिंबा देणार्‍या राजकीय नेत्यांचीही संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात आता शरद पवार यांचीही भर पडल्याने भाजपाविरोधात मजबूत आघाडी स्थापन होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत पवार बोलत होते. भाजपाप्रणीत रालोआला आगामी निवडणुकीत रोखण्यासाठी विरोधकांनी संघटित होऊन महाआघाडी स्थापन करण्याची नितांत गरज आहे आणि लोकप्रियतेचे शिखर गाठत असलेले नितीशकुमार यांनीच या आघाडीचे नेतृत्व करावे, असे सांगताना सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंगे्रस पक्ष राहुलच्या नेतृत्वाखालील कॉंगे्रस पक्षापेक्षा कितीतरी जास्त प्रभावी आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
कॉंगे्रस पक्षाकडे सध्या एकही लोकप्रिय चेहरा नाही. तिथेच नितीशकुमार सलग दहा वर्षांपासून मुख्यमंत्रिपदावर आहेत आणि त्यांची लोकप्रियताही वाढत आहे. अशा स्थितीत मी पंतप्रधानपदासाठी आपली पसंती नितीश यांनाच देईन. असे असले, तरी भाजपाविरोधात स्थापन होणार्‍या कोणत्याही राष्ट्रीय आघाडीत कॉंगे्रसचा समावेश असणे आवश्यक असल्याचे मतही पवारांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांच्याविषयी आताच काही ठोसपणे सांगता येणार नाही. लोकांमध्ये मिसळण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. लोकनेता म्हणून समोर येण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे. आगामी तीन वर्षांत ते कशी कामगिरी करतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
मायावतींना विजय मिळेल
उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वासही पवारांनी व्यक्त केला. मुलायमसिंह यांच्या समाजवादी पार्टीवर पवारांची नाराजीच यातून दिसून येते.
केजरीवालांचे केवळ नाव ऐकले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही शरद पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. केजरीवाल यांच्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, केजरीवालांना कोणीही ओळखत नाही. माझी देखील त्यांच्यासोबत फार ओळख नाही. मी केवळ त्यांचे नाव ऐकले.
दरम्यान, २०१९ वर्षे फार दूर असल्यामुळे आपण या महाआघाडीविषयी आताच काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मायावती यांनी शरद पवारांच्या विधानावर व्यक्त केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28095

Posted by on Apr 30 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (406 of 2453 articles)


रत्नागिरी, [२९ एप्रिल] - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना भाजपाने जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. ...

×