Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » निवडणूक आयोगाचे पथक आजपासून बिहारात

निवडणूक आयोगाचे पथक आजपासून बिहारात

=मतदार याद्या अद्ययावत करणार=
नवी दिल्ली, [७ जून] – याचवर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग चार विशेष पथकं उद्या सोमवारी बिहारात पाठविणार असून, मतदार याद्यांमधील बनावट नावे वगळून त्या अद्ययावत करण्यावर या पथकांचा भर असणार आहे.
ही पथके निवडणूक आयोगात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या रेग्युलेटरी ऑडिट डिव्हिजनचा भाग असतील. या चार पथकांमध्ये प्रत्येकी सहा अधिकार्‍यांचा समावेश असेल आणि बिहार ही त्यांची पहिली जबाबदारी आहे, अशी माहिती अधिकृत सूत्राने दिली. राज्यात सध्या असलेल्या मतदारयाद्यांची सखोल तपासणी करण्यासह त्यामध्ये असलेली नकली नावे वगळणे, नावांमध्ये दुरुस्ती करणे, छायाचित्र असलेले ओळखपत्र वितरित करणे आणि मतदारांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर केलेले वेगवेगळे अर्ज निकाली काढणे ही जबाबदारी या पथकांकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. २४३ सदस्यीय बिहार विधानसभेसाठी येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22726

Posted by on Jun 8 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1655 of 2452 articles)


=बांगलादेशकडून भारताला मिळणार ७,११० एकर जमीन : पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याची फलश्रुती= ढाका, [६ जून] - गेल्या ४१ वर्षांपासून रखडलेल्या ऐतिहासिक ...

×