Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » नेताजींचे पणतू घेणार मोदींची भेट

नेताजींचे पणतू घेणार मोदींची भेट

suryakumar bose-narendra modiबर्लिन, [११ एप्रिल] – नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे पणतू सूर्यकुमार बोस सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, नेताजींच्या रहस्यमय बेपत्ता होण्याशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी करणार आहेत.
हॅमबर्ग येथील भारत-जर्मन असोसिएशनचे अध्यक्ष असलेले सूर्यकुमार बोस यांना मोदी यांच्या जर्मन भेटीच्या पार्श्‍वभूमीवर बर्लिन येथे होणार्‍या समारंभाात सहभागी होण्यासाठी येथील भारतीय दूतावासाने विशेष निमंत्रित केले आहे. या बैठकीत सूर्यकुमार नेताजींवरील फाईल्स सार्वजनिक करण्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांचे बंधू चंद्र बोस यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
वर्गिकृत दस्तावेजांच्या नावाखाली नेताजींच्या फाईल्स अनेक वर्षांपासून दडवून ठेवलेल्या आहेत. पण, आता या फाईल्स सार्वजनिक करण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीपासूनच पारदर्शक व्यवहारावर भर दिला असल्याने त्यांचे सरकार नेताजींवरील फाईल्स सार्वजनिक करतील, असा आम्हाला विश्‍वास आहे, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21960

Posted by on Apr 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1811 of 2458 articles)


पॅरिस / नवी दिल्ली, [११ एप्रिल] - भारत फ्रान्सकडून उड्डाण क्षमता असलेली ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याचे पंतप्रधान ...

×