Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » नेपाळमध्ये आजपासून दक्षिण आशियाई बैठक

नेपाळमध्ये आजपासून दक्षिण आशियाई बैठक

=भारत-पाकचे विदेश सचिव भेटण्याची शक्यता=
Saarc-insurance-conferenceनवी दिल्ली, [१३ मार्च] – भारत व पाकिस्तान यांच्या विदेश सचिवांची बहुप्रतीक्षित भेट नेपाळमधील पर्यटन स्थळ असलेल्या पोखरा या शहरात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोखरातच उद्या सोमवारी दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघाची एक महत्त्वाची बैठक सुरू होत आहे.
१४ ते १७ मार्च असे चार दिवस चालणार्‍या संघाच्या बैठकीत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह संघाचे संयुक्त सचिवही असलेले परराष्ट्र सचिव एस. जयशंकर सहभागी होणार आहेत. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विदेश सल्लागार सरताज अझिज व विदेश सचिव ऐजाक अहमद चौधरी हेसुद्धा या बैठकीत सहभागी होण्यासाठी पोखराला येत आहेत.
तीन महिन्यानंतर दोन्ही देशांचे नेते तसेच अधिकारी औपचारिक चर्चा करण्यासाठी एकमेकांसमोर येत आहेत. तथापि, पठाणकोट येथील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये संपर्क व संवाद यांना औपचारिकेतपासून दूर ठेवण्याबाबत व ठोस परिणाम निघण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे समजते.
एस. जयशंकर यांची पाकच्या विदेश सचिवांशी १४ जानेवारी रोजी भेट होणार होती. पण, २ जानेवारी रोजी पठाणकोट हवाईतळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर ही चर्चा खुंटली. मात्र पोखरात हा अडथळा दूर होईल, अशी चर्चा आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27285

Posted by on Mar 14 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (671 of 2453 articles)


=भाजपाची माफीची मागणी= नवी दिल्ली, [१३ मार्च] - जमियत उलेमा-ए-हिंद या मुस्लिम संघटनेच्या व्यासपीठावर देशद्रोहाचे आरोपी उमर खलिद आणि अनिर्बान ...

×