Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदी उज्बेकिस्तानमध्ये दाखल

पंतप्रधान मोदी उज्बेकिस्तानमध्ये दाखल

=मध्य आशियाई देशांचा दौरा, ब्रिक्स परिषद, शांघाय संमेलनासही उपस्थित राहणार=
India's PM Modi reacts during a meeting with Brazil's President Rousseff on the sidelines of the 6th BRICS summit at the Alvorada Palace in Brasiliaनवी दिल्ली, [६ जुलै] – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी सकाळी आठ दिवसांच्या परदेश दौर्‍यावर रवाना झाले आणि पाच मध्य आशियाई देशांच्या दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता उज्बेकिस्तानमध्ये दाखल झाले.
आपल्या आठ दिवसांच्या परदेश दौर्‍यात पंतप्रधान मोदी उज्बेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान आणि ताझिकिस्तान या पाच देशांना भेट देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी रशियाकडे प्रस्थान करणार आहेत. ते रशियात होणार्‍या ब्रिक्स आणि शांघाय शिखर संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करतील. पंतप्रधानांचा हा परदेश दौरा येत्या १३ जुलैपर्यंत आहे.
भारत उज्बेकिस्तानसोबत व्यावसायिक आणि इतर क्षेत्रात भागीदारी वाढविणारे महत्त्वाचे करार करण्यात येणार आहेत. आम्ही आमचे लोकप्रिय माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना ताश्कंद येथे गमावले होते. त्यामुळे आपण या दौर्‍यात भारताच्या या महान नेत्याला नमन करणार आहोत, असे पंतप्रधानांनी दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले.
एक वर्षात १९ देशांचा दौरा
गेल्या २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांनी आतापर्यंत १२ परदेश दौरे केले आणि १९ देशांना भेटी दिल्या. माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या एक वर्षात भूतान, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, फिजी, सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, चीन, दक्षिण कोरिया, मंगोलिया आणि बांगलादेश या देशांचा दौरा केला आहे. लखनौ येथील आरटीआय कार्यकर्ते संजय शर्मा यांनी पीएमओमध्ये हा अर्ज दाखल केला होता.
मोदी-शरीफ शुक्रवारी भेट?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची रशियात होणार्‍या एससीओ परिषदेदरम्यान भेट होण्याची दाट शक्यता आहे. सूत्राने याबाबत दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेते रशियात होणार्‍या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेच्या ठिकाणी भेटणार आहेत. मात्र, या भेटीबाबतची विस्तृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात काठमांडू येथे झालेल्या सार्क सदस्य राष्ट्रांच्या परिषदेला दोन्ही नेते उपस्थित होते. परंतु, त्याठिकाणी कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती. मुस्लिमांच्या पवित्र रमझान महिन्याला प्रारंभ होत असताना पंतप्रधान मोदी यांनी शरीफ यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या होत्या आणि दोन्ही देशांदरम्यान शांततापूर्ण द्विपक्षीय संबंधांची गरज व्यक्त केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23296

Posted by on Jul 7 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1576 of 2453 articles)


मुंबई, [५ जुलै] - गुड्‌स ऍण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थातच जीएसटी या नव्या कररचनेमुळे वेगवेगळ्या करांमुळे निर्माण होणारी गुंतागुंत संपुष्टात येऊन ...

×