Home » ठळक बातम्या, मराठवाडा » पद्मसिंह पाटलांच्या विरोधात अण्णा उठविणार आवाज

पद्मसिंह पाटलांच्या विरोधात अण्णा उठविणार आवाज

Anna Hazareपुणे, (१ मार्च) – खुनाचा आरोप असलेले उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील यांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नाराज झाले आहेत. राळेगणसिद्धी येथे बोलताना अण्णा म्हणाले, ‘आता लोकांनी विचार करण्याची गरज आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने भ्रष्टाचारी उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. आपण अशा प्रकरणांवर आवाज उठविण्याची गरज आहे.’ खुनाचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या या उमेदवाराच्या विरोधात आपण प्रचार करणार असल्याचे अण्णांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, ‘अशा उमेदवाराला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याची मी लोकांकडे मागणी करणार आहे. तसेच आपल्याला भ्रष्ट लोकांना संसदेपासून लांबच ठेवायला हवेत.’ कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप पाटील यांच्यावर आहे. २००९ साली पारनेर पोलिसांनी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पाटील यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला होता. हजारे यांनी पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात कलम १२०(ब) (कटकारस्थान), ३०२ (खुन) आणि ५११ (खुनाचा प्रयत्न करणे) तसेच कलम ३४ या भादंविअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=11516

Posted by on Mar 2 2014. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (2439 of 2454 articles)


=गडकरी यांचा मीडियाला टोला= नाशिक, (२२ फेबु्वारी) - विकासाच्या, नावीन्यपूर्ण कल्पना मला जिथेकुठे दिसून येतात, त्या सर्वच ठिकाणी जाण्याचे मला ...

×