Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पनामा पेपर्सप्रकरणी सत्यता तपासणार

पनामा पेपर्सप्रकरणी सत्यता तपासणार

=तूर्तास निष्कर्ष काढू नका : आरबीआयचा इशारा=
RBI-BULDINGनवी दिल्ली, [६ एप्रिल] – भारतासह जगभरातील बड्या व्यक्तींचा काळा पैसा उघड करणार्‍या पनामा पेपर्स प्रकरणी सध्याच कुठलाही निष्कर्ष काढू नका. पनामा पेपर्सचा अहवाल सत्य आहे की नाही, हे आम्ही तपासून पाहणार आहोत, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज बुधवारी स्पष्ट केले.
पनामा पेपर्सने विदेशात काळा पैसा जमा करणारे चित्रपट अभिनेते आणि उद्योगपतींसह भारतातील सुमारे ५०० लोकांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी सरकारने विशेष कृती दल स्थापन केले असून, यात आरबीआयचाही सहभाग आहे, असे आरबीआयचे उपगव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी येथे एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पनामा पेपर्सच्या अहवालातील प्रत्येकच बाब बेकायदेशीर आहे किंवा कायदेशीर आहे, असा निष्कर्ष आताच काढणे योग्य होणार नाही. आम्ही सविस्तर माहिती प्राप्त करीत आहोत. पुराव्यांचाही अभ्यास करीत आहोत. त्यानंतरच आम्ही ठोस निष्कर्ष काढणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पनामा पेपर्सने जाहीर केलेल्या भारतीय नागरिकांनी खरोखरच आपला काळा पैसा विदेशात जमा केला आहे काय, याची शहानिशा आम्ही करीत असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीही मंगळवारी द्विमासिक पतधोरणाचा आढावा घेताना सांगितले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27746

Posted by on Apr 7 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (514 of 2453 articles)


नवी दिल्ली, [७ एप्रिल] - किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज ...

×