Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » परराष्ट्र मंत्रालयात मोठे फेरबदल

परराष्ट्र मंत्रालयात मोठे फेरबदल

=पाक, चीन, युनोत नव्या राजदूतांची नियुक्ती=
MEA-INDIA Ministry of External Affair'sनवी दिल्ली, [२४ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआच्या केंद्र सरकारने आज गुरुवारी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात मोठे फेरबदल केले असून, पाकिस्तान, चीन, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रसंघात नव्या प्रतिनिधींची नेमणूक केली आहे.
सध्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव (पश्‍चिम) या पदावर कार्यरत असलेले नवतेज सरना यांची ब्रिटनमधील भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरना रंजन मथाई यांची जागा घेतील. भूतानमधील भारताचे राजदूत गौतम बम्बावले यांची पाकिस्तानमध्ये टीसीए राघवन यांच्या जागी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राघवन ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबरच्या मध्यात होणार्‍या ब्रिटन दौर्‍यानंतर सरना आपला पदभार स्वीकारतील, अशी अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालयातील माजी प्रवक्ते सईद अकबरुद्दिन यांची संयुक्त राष्ट्रसंघात न्यूयॉर्क येथे भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक मुखर्जी यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकबरुद्दिन सध्या एक्सपी डिव्हिजनमध्ये संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असून, ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या भारत-आफ्रिका संमेलनाचे अतिरिक्त प्रभारी सचिव आहेत. जर्मनीतील भारताचे राजदूत विजय गोखले यांची बीजिंग येथे अशोक कंठ यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पूर्व) अनिल वाधवा यांची रोम येथील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज सरन यांना मॉस्को येथे पाठविण्यात आले आहे. सरन तेथे पी. एस. राघवन यांची जागा घेतील. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यापैकी बहुतांश पदांवरील नियुक्ती प्रत्यक्षात डिसेंबरच्या अखेरपासून ते जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत होईल. नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयात अमर सिन्हा व अमरेंद्र खाटुआ अनुक्रमे पूर्व आणि पश्‍चिमचे सचिव असतील. सिन्हा सध्या अफगाणिस्तानात भारतीय राजदूत आहेत, तर खाटुआ अर्जेंटिनामध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24040

Posted by on Sep 25 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1413 of 2453 articles)


 ७१७ ठार, ८६० जखमी २५ वर्षांतील भीषण दुर्घटना मृतांमध्ये एक भारतीय मिना, [२४ सप्टेंबर] - जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या ...

×