Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाक, चीनचा भारताविरुद्ध कट

पाक, चीनचा भारताविरुद्ध कट

=सीमेवर सुरू आहे बंकर्सचे बांधकाम=
rajasthan-borderजयपूर, [२२ एप्रिल] – भारतासोबत मैत्रीची भाषा बोलणार्‍या चीन आणि पाकिस्तानने आपला खरा चेहरा दाखविण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही देशांनी भारतविरोधात युद्धाचा कट रचून राजस्थानला लागून असलेल्या भारत-पाक सीमेवर बंकर्स बांधणे सुरू केले आहे. ही बाब समोर आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी या सीमावर्ती भागाचा उद्या शनिवारी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाक आणि चीनकडून सीमेवर ज्या प्रकारचे बंकर्स उभारले जात आहेत, ते बंकर्स केवळ युद्धाच्या स्थितीतच उपयोगात येत असतात. हे बंकर्स अतिशय मजबूत असून, त्यांच्या बांधकामासाठी ‘डेजर्ट वॉरफेयर’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. गेल्या एक महिन्याच्या काळात पाकने राजस्थान सीमेलगत अशाप्रकारचे १८० बंकर्स तयार केले आहेत. याशिवाय, आणखी १०० बंकर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्राने दिली. जैसलमेर, बिकानेर, बाडमेर आणि श्रीगंगानगर या भागात हे बंकर्स उभारण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, सीमेवरील याच परिसरात १९७१ च्या युद्धात भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांची कोंडी केली होती. त्यामुळे भविष्यात युद्ध झाल्यास भारतीय जवान या भागातून पाकच्या हद्दीत प्रवेश करणार नाही, याची काळजी घेण्यासाठी हे बंकर्स उभारण्यात येत असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
पाक आणि चीन केवळ बंकर्सच नव्हे, तर डेटका टोबा, हरंगवाला, बचोल, जमेश्‍वरी, चुरूनपढ यासारख्या भागांमध्ये मजबूत रस्ते आणि हेलीपॅडचीही निर्मिती करीत असल्याचे वृत्त आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27936

Posted by on Apr 23 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (455 of 2453 articles)


उज्जैन, [२२ एप्रिल] - हिंदूंच्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाला, कुंभमेळ्याला उज्जैैनमध्ये सुरुवात झाली असून या उत्सवातील पहिले शाहीस्नान आज झाले. ...

×