Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांवर आरोप करणे चुकीचे

प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांवर आरोप करणे चुकीचे

=जितेंद्र सिंह यांची भूमिका=
Jitendra Singh1नवी दिल्ली, [१ जानेवारी] – देशात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज शुक्रवारी विशद केली. प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्ली सरकार ज्या पद्धतीने हाताळत आहेत, त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच दोन प्रशासकीय अधिकार्‍यांचे निलंबन केले होते. पण, केंद्र सरकारने केजरीवालांचा आदेश रद्द ठरवून ते सेवेत असल्याचेच मानले जावे, असे स्पष्ट केले. यानंतर केजरीवाल यांनी ट्विटरवरून पंतप्रधानांवर टीकेची झोड उठविली होती. याच अनुषंगाने जितेंद्र सिंह यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना आपले मत स्पष्ट केले.
प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरणे आणि त्यांच्यावर टीका करणे हा स्वस्तात लोकप्रियता मिळविण्याचा केजरीवालांचा उद्योगच झाला आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांना निर्भय आणि मुक्तपणे काम करता यावे, यासाठी मोदी सरकारने देशात अतिशय पोषक वातावरण निर्माण केले आहे. सुशासन देण्याचा आमचा निर्धार आहे आणि यात प्रशासकीय अधिकार्‍यांची भूमिका महत्त्वाची असते. पण, केजरीवालांना मात्र पंतप्रधानांवर टीका करण्यातच जास्त समाधान मिळते, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26363

Posted by on Jan 2 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (955 of 2453 articles)


मुंबई, [२ जानेवारी] - राज्य सरकारने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ वाल्यांना चांगला दणका देण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर आता गाडी चालवताना ...

×