Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » फुल्का यांचा ‘आप’ला रामराम

फुल्का यांचा ‘आप’ला रामराम

=केजरीवालांना आणखी एक धक्का=
h-s-phoolkaनवी दिल्ली, [१९ सप्टेबर] – गंभीर गुन्ह्यांत आमदारांचे सुरू असलेले अटकसत्र, लोकप्रियतेत सातत्याने होत असलेली घट आणि पक्षांतर्गत बंडखोरी यामुळे बेजार झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज शनिवारी आणखी एक मोठा धक्का बसला. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कायदेतज्ज्ञ एच. एस. फुल्का यांनी शनिवारी पक्षाच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला.
केजरीवाल यांची कार्यशैली आणि हुकूमशाही वृत्तीवर फुल्का आधीपासूनच नाराज होते. केजरीवाल यांची निर्णय घेण्याची पद्धतही त्यांना मान्य नव्हती. यावरून त्यांच्यात अनेकदा टोकाचे मतभेदही उफाळून आले आहेत. तथापि, फुल्का यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देताना मात्र या मतभेदांचा कुठेही उल्लेख केला नाही. उलट, शिखविरोधी दंगल प्रकरणी आता जास्त लक्ष देण्याची गरज असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले.
राजीनाम्याच्या मुद्यावर मी केजरीवाल यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनीही मला त्यासाठी परवानगी दिली. शिखविरोधी दंगलीतील पीडितांना न्याय मिळावा, यासाठी मी राजकारणाचा त्याग करीत आहे. केजरीवालांसोबत माझे कोणतेही मतभेद नाहीत, असे त्यांनी नंतर चंदीगड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. माझ्या मते, प्रत्येक व्यक्तीने समाजसेवा करण्यासाठी स्वत:ला वाहून घ्यायला हवे. १९८४ मध्ये देशात शिखविरोधी दंगली उसळल्या, तेव्हा मी तरुण होतो. वकील म्हणून मी पीडितांना न्याय देण्याची जबाबदारी स्वीकारली होती. हा लढा आता निर्णायक टप्प्यात असल्याने त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23905

Posted by on Sep 20 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1444 of 2452 articles)


नेताजींशी संबंधित ६४ फाईल्स सार्वजनिक गुप्त पाळतही ठेवली जात होती आणखी रहस्य उलगडण्याची शक्यता कोलकाता, [१८ सप्टेंबर] - पश्‍चिम ...

×