Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » बहुभाषा हीच भारताची संपत्ती : स्मृती इराणी

बहुभाषा हीच भारताची संपत्ती : स्मृती इराणी

SMRUTI IRANIचेन्नई, [२१ फेब्रुवारी] – देशात बोलल्या जात असलेल्या अनेक भाषा हीच देशाची खरी संपत्ती असून, देशाला लाभलेला हा सांस्कृतिक वारसा असल्याचे मत व्यक्त करीत याचा आपण सन्मान केला पाहिजे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
मैत्रीभाषा (मातृभाषा दिवस) दिनानिमित्त एथिराज महिला कॉलेजमधे आयोजित ‘देशातील विविधता आणि भाषिक समृद्धता’ या विषयावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. देशात हजार पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. आमच्यासाठी ही गौरवाची बाब आहे. दुसर्‍या मातृभाषेचा सन्मान करणे आपण शिकले पाहीजे, असे सांगताना स्वातंत्र्यसेनानी आणि कवी सुब्रमण्यम भारती यांचे उदाहरण इराणी यांनी दिले. त्यांनी ३० भाषा आत्मसात केल्या होत्या, कारण ते इतर भाषांचा आदर करीत होते. असे असले तरी स्वत:ची मातृभाषा त्यांना अत्यंत प्रिय होती असे भारती नेहमी सांगत.
देशात अनेक भाषा बोलल्या जात असल्या, तरी देशातील आव्हानांचा सामना करीत देशाला उज्ज्वल भविष्य देणे आपले कर्तव्य असल्याचे स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20816

Posted by on Feb 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2025 of 2453 articles)


=आयबी, गृहमंत्रालयाची होती नजर= नवी दिल्ली, [२१ फेब्रुवारी] - पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरण हे आजचे नसून, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ...

×