बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा निश्चित
Sunday, June 7th, 2015=१९ जूनला होणार घोषणा=
मुंबई, [५ जून] – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा येत्या १९ जून रोजी वर्धापनदिन असून, त्याच दिवशी स्मारकाच्या जागेची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
बाळासाहेबांचे आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथेच अंत्यसंस्कार करण्यात आला होता. त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी शिवसेनेची मागणी होती. पण, त्यावेळी सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शिवाजी पार्कची जागा उपलब्ध करून देण्यास नकार दिला होता. तेव्हापासूनच बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेबाबतचा वाद सुरू आहे. तथापि, स्वत: शिवसेनेनेच या स्मारकासाठी पर्यायी जागा शोधली आहे.
विशेष म्हणजे, बाळासाहेबांचे स्मारक दादरमध्येच होणार आहे. शिवाजी पार्क भागातील महापौर बंगल्याजवळ असलेल्या सावरकर स्मारकाच्या आसपास ही जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.
शिवसेनेचा जन्म दादरमध्येच झाला आणि याच परिसरात शिवसेना वाढली आहे. बाळासाहेबांच्या बहुतेक सर्वच सभा याच शिवाजी पार्कवर झाल्या. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मारक याच परिसरातच उभारले जावे, अशी इच्छा स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही आहे. स्मारकासाठी शिवसेनेकडून गेल्या दोन वर्षांपासून जागेची चाचपणी सुरू होती. अखेर जागा शोधण्यात शिवसेनेला यश आले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे उन्हाळी सुटीसाठी कुटुंबासह मुंबईबाहेर आहेत. ते परतल्यानंतर १९ जून रोजी याबाबतची घोषणा होऊ शकते, असे सूत्राने सांगितले. १९ जून हा शिवसेनेचा स्थापना दिवस आहे. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. यंदा शिवसेना सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22702

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!