Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » बीएसएफच्या ४० चौक्यांवर गोळीबार

बीएसएफच्या ४० चौक्यांवर गोळीबार

  • पाकच्या कुरापती सुरूच
  • जवान शहीद
  • भारताचे चोख प्रत्युत्तर

pakistani_soldier_borderजम्मू, [५ जानेवारी] – रविवारची रात्र शांत राहिल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी सांबा आणि कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तब्बल ४० चौक्यांवर बेछूट गोळीबार करून तोफांचाही मारा केला. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे.
सोमवारी सकाळी हलक्या मशीनगन्सने गोळीबार केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पाकी बंदुका व तोफा अक्षरश: आग ओकू लागल्या. सायंकाळी उशिरापर्यंत हा गोळीबार सुरू होता. बीएसएफच्या जवानांनीही लगेच बंदुका व तोफा उपसून पाकला ठोस प्रत्युत्तर दिले, अशी माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला दिली. देविंदर कुमार असे शहीद जवानाचे नाव आहे.
दरम्यान, सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ५७ गावांमधील सुमारे पाच हजार लोकांना घरदार सोडावे लागले आहे. पाक सैनिकांनी रविवारी सायंकाळी कठुआतील एक आणि सांबा सेक्टरमधील एका चौकीवर गोळीबार केला होता. या गोळीबाराला बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिल्याने पाकी बंदुका शांत झाल्या होत्या. त्यानंतर रात्रभर सीमा शांत होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19491

Posted by on Jan 6 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2277 of 2453 articles)


=पंतप्रधानांनी केला योजनेचा प्रारंभ= नवी दिल्ली, [५ जानेवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी राजधानी दिल्लीत घरगुती वीज वाचविण्याच्या ...

×