Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ वाढणार

भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ वाढणार

=बिहार निवडणुक जिंकणे भाजपासाठी आवश्यक=
bihar election1नवी दिल्ली, [२० ऑक्टोबर] – बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले, तर राज्यसभेतील भाजपाच्या संख्याबळात काही प्रमाणात तरी वाढ होऊ शकते. त्यामुळे बिहारची निवडणूक जिंकणे भाजपासाठी जीवनमरणाचा प्रश्‍न झाला आहे.
लोकसभेत भाजपाजवळ स्पष्ट बहुमत आहे. पण, राज्यसभेत भाजपा अल्पमतात आहे. त्यामुळे कोणतेही विधेयक लोकसभेत तर पारित होते, पण राज्यसभेत विरोधक भाजपाची कोंडी करतात. यामुळेच अनेक महत्त्वपूर्ण विधेयके राज्यसभेत प्रलंबित आहेत.
राज्यसभेत विरोधकांचे संख्याबळ सध्या ९६ आहे, तर भाजपाचे फक्त ४० आहे. त्यामुळे राज्यसभेत बहुमत मिळवायला भाजपाला आणखी काही वर्षे लागणार असली, तरी त्याची सुरुवात बिहारमधील विधानसभा निवडणुकीने होऊ शकते. पुढील वर्षीच्या जुलै महिन्यात बिहारमधून राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपाला यावेळी स्पष्ट बहुमत मिळाले, तर यातील किमान तीन जागा भाजपा जिंकू शकेल. याशिवाय, राजस्थानच्या चार आणि उत्तरप्रदेशच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राजस्थानमध्ये भाजपाचेच सरकार असल्यामुळे येथून राज्यसभेच्या किमान दोन ते तीन जागा भाजपाला मिळू शकतील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्य नामनियुक्त करीत असतात. यातील एच. के. दुआ आणि डॉ. अशोक गांगुली यांचा कार्यकाळ पुढील महिन्यातच संपत आहे. त्यामुळे या दोघांच्या जागेवर मोदी सरकार दोन सदस्यांची नियुक्ती करू शकते. विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनातच या दोघांना सभागृहातून निरोप देण्यात आला होता. याशिवाय नामनियुक्त अशा आणखी पाच सदस्यांचा कार्यकाळ मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. यात डॉ. भालचंद्र मुणगेकर, जावेद अख्तर, मणिशंकर अय्यर याचा समावेश आहे. त्यामुळे जवळपास अर्धा डझन लोकांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्याची संधी मोदी सरकारला मार्चपर्यंत मिळणार आहे. मात्र, नामनियुक्त सदस्यांना राज्यसभेत मताधिकार नसतो. यामुळे राज्यसभेतील भाजपाचे संख्याबळ वाढणार आहे. मात्र त्याचा फायदा प्रत्यक्षात मिळायला भाजपाला आणखी काही वर्षे वाट पहावी लागणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25228

Posted by on Oct 21 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1310 of 2453 articles)


केंद्राची धडक मोहीम साठेबाजांचे धाबे दणाणले पाच राज्यांमध्ये व्यापक धाडी नवी दिल्ली, [२० ऑक्टोबर] - ऐन सणासुदीच्या दिवसात तूर ...

×