Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची फेरनिवड

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची फेरनिवड

Raosaheb-Patil-Danveमुंबई, [१८ जानेवारी] – राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होताच केंद्रातील राज्यमंत्रिपदाचा त्याग करून प्रदेशाध्यक्ष झालेले खासदार रावसाहेब दानवे यांची पुन्हा तीन वर्षांसाठी महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या फेरनिवडीची घोषणा केली.
यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी आपण पक्ष संघटनेतून तयार झालेला कार्यकर्ता असून, पक्षकामासाठी अधिक झोकून काम करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्यावर जो विश्‍वास टाकला तो सार्थ ठरवण्याची ग्वाही दानवे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी प्रदेश प्रभारी सरोज पांडे, निवडणूक अधिकारी सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते. यावेळी राज्याचे मंत्री प्रकाश मेहता, सुजित कांबळे, विद्या ठाकूर, प्रवीण पोटे व मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलारही प्रामुख्याने उपस्थित होते.
पत्रकारांनी आगामी निवडणुकीसंदर्भात विचारले असता, निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यावेळची परिस्थिती काय असते, यावर विचार विनिमय करून निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येत असल्याचे सांगत, आगामी बीएमसीच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवण्याचा संकल्प दानवे यांनी सोडला. त्याचबरोबर राज्य सरकार शेतकर्‍यांसाठी व आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना विविध पद्धतीने मदत करीत असून, सरकारच्या असलेल्या योजना योग्य पद्धतीने राबविल्या जात असल्याचे सांगत राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले.
राज्यात भाजपाचे सरकार येताच खासदार दानवे यांच्या गळ्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालण्यात आली होती. त्यासाठी दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा त्याग केला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तेव्हापासून दानवे यांच्या कार्याला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली होती. सभासद नोंदणी हे दानवे यांचे महत्त्वपूर्ण काम ठरले. सभासद नोंदणीच्या बाबतीत भाजपने राज्यात कोटींची उड्डाणे केली. यावर्षी १ कोटी ०५ लाख नागरिक भाजपाचे सभासद झाले. त्यांच्यामार्फत दानवे यांनी जनसंपर्क अभियान सुरू केले. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. या सर्वांचा विचार करता खा. रावसाहेब दानवे यांचीच पुन्हा तीन वर्षांसाठी भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली.
दानवे यांच्यामुळे प्रगती : मुख्यमंत्री
राज्यात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्या फळीचे कार्यकर्ते निवडून आले. त्यामुळे पक्षापुढे अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत चिंता होती. अशावेळी रावसाहेब दानवे पुढे आले. केंद्रातील मंत्रिपदाचा त्याग करून त्यांनी राज्यात पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांच्या काळात पक्षाने अनेक उपक्रम राबवले. त्यामुळेच त्यांची तीन वर्षे अध्यक्षपदाकरिता फेरनिवड झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दुसरा अर्जच नाही : निरीक्षक रूपाला
प्रदेश अध्यक्षपदासाठी दानवे यांच्यासमोर दुसर्‍या कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आला नाही. त्यामुळे रावसाहेब दानवे यांचीच अध्यक्षपदासाठी फेरनिवड करण्यात आली, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि निवडणूक निरीक्षक खासदार पुरुषोत्तम रूपाला यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26561

Posted by on Jan 19 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (897 of 2451 articles)


जयपूर, [१६ जानेवारी] - पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयने भारतातील सशस्त्र दलांमध्ये आपले हेरगिरीचे जाळे विणले आहे. ते पूर्णपणे नष्ट ...

×