Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतात गरीब जास्त, पण दारिद्र्याचे प्रमाण कमी!

भारतात गरीब जास्त, पण दारिद्र्याचे प्रमाण कमी!

=जागतिक बँकेचा ताजा अहवाल=
World-Bankवॉशिंग्टन, [५ ऑक्टोबर] – भारतात २०१२ मध्ये इतर गरीब देशांच्या तुलनेत गरिबांची संख्या सर्वाधिक होती. पण, भारतातील दारिद्र्याचे प्रमाण मात्र इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कमी होते, असे जागतिक बँकेने आपल्या ताजा अहवालात म्हटले आहे. गरिबीचे मोजमाप करण्याच्या नव्या पद्धतीनुसार हा अभ्यास करण्यात आला आहे.
संपूर्ण जगात अतिशय दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या लोकांची संख्या यावर्षीच्या अखेरपर्यंत एकूण जागतिक लोकसंख्येच्या दहा टक्के इतकी होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे.
२०१२ मध्ये भारतातील गरिबांची संख्या जगाच्या पाठीवरील इतर गरीब देशांच्या तुलनेत सर्वांत जास्त होती. एकंदरित भारत देश जगभरातील गरिबांचे घरच झाले होते. पण, सर्वाधिक गरीब असतानाही, भारतातील दारिद्र्याचे प्रमाण या गरीब देशांच्या तुलनेत सर्वांत कमी होते. दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी अनेक देशांनी व्यापक मोहीम उघडली आहे. २०३० पर्यंत दारिद्र्याचे समूळ उच्चाटन करण्याचे जगाचे उद्दिष्ट आहे, असे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद आहे. भारतातील घरांची स्थिती काय आहे, हे या अभ्यासात जाणून घेण्यात आले आहे.
कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील दारिद्र्याचे प्रमाण २०१२ मध्ये ४३ टक्के इतके होते. तर, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हेच प्रमाण १९ टक्के होते. विशेष म्हणजे, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जगभरातील एकूण गरिबांपैकी अर्ध्या पेक्षा जास्त गरिबांचे वास्तव्य आहे.
अति दारिद्र्याखालील लोकांच्या संख्येत घट होणे, ही आनंदाचीच बाब आहे. मानवी इतिहासात आपली पहिली पिढी आहे, जी दारिद्र्य संपवू शकते, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यॉंग किम यांनी सांगितले. जागतिक बँकेने यापूर्वी दिवसाला १.२५ डॉलर्सपेक्षा (७५ रुपये) कमी पैशात उदरनिर्वाह करणार्‍या लोकांचा अतिदारिद्र्याखालील व्यक्तींच्या यादीत समावेश केला होता. आता त्यात बदल करीत. १.९० डॉलर्सपेक्षा कमी पैशात उदरनिर्वाह करणारी व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली असल्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे आणि विशेषत: भारतात शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक सुरक्षा क्षेत्रात गुंतवणूक वाढली असल्यामुळे गरिबी कमी झाली आहे. परंतु, मंदावलेला जागतिक विकास, जागतिक शेअर बाजारात सातत्याने सुरू असलेला चढ-उतार आणि तरुणांमधील वाढती बेरोजगारी अजूनही चिंतेचे कारण आहे, असेही जागतिक बँकेच्या अहवालात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24164

Posted by on Oct 6 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1381 of 2458 articles)


=घुसखोरी रोखण्यास मदत मिळणार= श्रीनगर, [५ ऑक्टोबर] - पाकव्याप्त काश्मिरातून दररोज होणारी अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर ...

×