Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतात व्यवसाय करणे आणखी सोपे

भारतात व्यवसाय करणे आणखी सोपे

  • १८९ देशांमध्ये १३० वे स्थान
  • एकाच झटक्यात १२ देशांना मागे टाकले

KAUSHIK_BASUवॉशिंग्टन, [२८ ऑक्टोबर] – व्यवसायासाठी सर्वाधिक पोषक वातावरण असलेल्या १८९ देशांच्या यादीत भारताने तब्बल १२ देशांना मागे टाकून १३० वे स्थान प्राप्त केले आहे. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात ही माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अवघ्या दीड वर्षांच्या काळात जी पावले उचलली, त्याचेच हे फलित आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता, या यादीत भारताने सरसकट १२ देशांना मागे टाकणे, ही या देशाची फार मोठी उपलब्धी आहे, असे मत जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बासू यांनी म्हटले आहे.
अर्थव्यवस्थेचा प्रचंड मोठा व्याप असलेल्या भारतासारख्या देशाने व्यवसायासाठी पोषक वातावरण असणार्‍या देशांच्या यादीत अल्पावधीतच स्वत:च्या कामगिरीत इतकी सुधारण करावी, ही लहान गोष्ट नाही. भारत आतापर्यंत या यादीत १४२ व्या क्रमांकावर होता. आता तो १३० व्या क्रमांकावर आहे. भारत सरकारने जे काही केले, ते जगभरातील गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेतच आहेत. सध्या भारताची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे, ती जगाला योग्य संकेत देणारीच आहे, असे बासू यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. जागतिक बँकेने ‘डुईंग बिझिनेस २०१६’ हा आपला अहवाल प्रकाशित केला आहे. याच अनुषंगाने बासू बोलत होते.
या अहवालात सिंगापूर आघाडीवर असून, त्यापाठोपाठ न्यूझीलंड, डेन्मार्क, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग, ब्रिटन आणि अमेरिकेचाही पहिल्या दहामध्ये समावेश आहे. भारताने गेल्या वर्षभरात आर्थिक आघाडीवर दोन महत्त्वाच्या सुधारणा राबविल्यामुळेच १२ देशांना मागे टाकणे भारताला शक्य झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी सुधारणा करू : जेटली
दरम्यान, जागतिक बँकेच्या अहवालावर समाधान व्यक्त करताना, भारतात व्यवसायाची स्थिती सुधारण्यासाठी आणखी आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. व्यवसायासाठी पोषक वातावरण असलेले ठिकाण म्हणून भारताचा विकास होत आहे, हे जागतिक बँकेने मान्य केले, यातच बरेच काही आले. या यादीत सध्या आम्ही १३० व्या स्थानावर असलो, तरी पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील गुंतवणूकदारांच्या मनात जो विश्‍वास निर्माण केला आहे, त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. अनेक देशांनी भारतात गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25393

Posted by on Oct 29 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1263 of 2458 articles)


तोयबाच्या निर्मितीमागे पाक, लादेन आमचा हिरो परवेज मुशर्रफ यांची जाहीर कबुली इस्लामाबाद, [२७ ऑक्टोबर] - अल कायदाचा म्होरक्या ओसामा ...

×