Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारताने अमूल्य रत्न गमावले : शांताक्का

भारताने अमूल्य रत्न गमावले : शांताक्का

SHANTAKKA2नागपूरः भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हळहळत आहे. ते भारताचे अमूल्य रत्न होते. माणसाने योग्य कर्म केल्यास तो नराचा नारायण होऊ शकतो. ही उक्ती सार्थ करणारे ते व्यक्तिमत्त्व होते, या शब्दात राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली.
सामान्य कुटुंबात जन्म घेऊन प्रयत्न व ज्ञानुबद्धी या आधारे ते भारताच्या सर्वोच्च म्हणजे राष्ट्रपतिपदी विराजमान झाले. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पोखरणमध्ये अणुचाचणी घेण्यात आली, त्याचे शिल्पकार व मार्गदर्शक देखील डॉ. कलामच होते. त्यांच्या या प्रयत्नामुळे भारत जगाच्या नकाशावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुन्हा उदयास आले.
वैज्ञानिक मनाचे डॉ. कलाम आपल्या संवेदनशील स्वभावामुळे सर्वांची मने जिंकून घेत होते. देशाचे भविष्य असलेले बालक व युवकांमध्ये मे रमून जात असत. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड करणे, देशाच्या दुर्गम भागात जाऊन त्याठिकाणी लोकांना साक्षर करणे व त्या माध्यमातून युवकांना देशकार्यात सामावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशभर ते मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध होते. पण खर्‍या अर्थाने ते देशभक्तीची मिसाईल होते. आपली बुद्धी, शक्ती, क्षमता व संपूर्ण जीवन त्यांनी भारतमातेच्या सेवेत समर्पित केले. निर्मोहित्व, निरहंकार, निरभिमान त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ओतप्रोत सामावले होते. किमान गरजा, साधी राहणी, मृदु भाषा या गुणांमुळे ते सर्व घटकांमध्ये लोकप्रिय होते. युवक व विज्ञान हेच त्यांच्यासाठी परमेश्‍वर होते. आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यामुळे विज्ञानक्षेत्रातील हा विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी समर्पित झाला, या शब्दात शांताक्का यांनी डॉ. कलाम यांना राष्ट्र सेविका समितीतर्फे श्रद्धांजली अर्पण केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23548

Posted by on Jul 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1539 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ जुलै] - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव आज मंगळवारी दुपारी दिल्लीतील पालम विमानतळावर ...

×