Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतावर मोठ्या अतिरेकी हल्ल्याची शक्यता

भारतावर मोठ्या अतिरेकी हल्ल्याची शक्यता

=पेन्टॅगॉनने दिला इशारा=
logo_-_the_pentagonवॉशिंग्टन, [१६ एप्रिल] – युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर लष्कर-ए-तोयबासारख्या पाकस्थित अतिरेकी संघटना भारतावर मोठा अतिरेकी हल्ला करू शकतात, अशा इशारा पेन्टॅगॉन या अमेरिकन संरक्षण संस्थेच्या वरिष्ठ कमांडरने आज गुरुवारी दिला आहे.
अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटो फौजांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर पुढील एक ते तीन वर्षे या भागात कार्यरत असलेल्या अतिरेकी संघटना भारतावर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे, असे युएस पॅसिफिक कमांडचे कमांडर ऍडमिरल सॅम्युअल जे. लॉकलीयर यांनी हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीला सांगितले. लष्कर-ए-तोयबा आणि पाकस्थित इतर अतिरेकी संघटना अफगाणिस्तानमध्येही लढाई सुरूच ठेवतील, असा दावाही त्यांनी केला.
लॉकलीयर यांनी आपल्या वक्तव्यात भारतातील नव्या सरकारच्या नेतृत्वाचाही उल्लेख केला आणि यामुळे अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे आणि दक्षिण आशियाई देशांसोबत क्षेत्रीय सहकार्य वाढविण्यावर जोर दिला आहे. दक्षिण-पूर्व देशांसोबतच्या सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधांचे सगळे श्रेय दोन दशकांपूर्वीपासून चालत आलेल्या ‘लुक ईस्ट’ धोरणाला जाते, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22125

Posted by on Apr 16 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1784 of 2458 articles)


कॅलिफोर्निया, [१६ एप्रिल] - मोबाईलवर असलेला कँडी क्रश सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे. आपल्यापैकी बरेच जण वेळ मिळताचा किंवा वेळ काढून ...

×