Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतासोबतचे संबंध मधुर : अमेरिका

भारतासोबतचे संबंध मधुर : अमेरिका

white-houseवॉशिंग्टन, [१० मार्च] – भारत आणि अमेरिका यांच्यात चांगले आणि मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानला आठ एफ-१६ विमाने विकण्याच्या निर्णयावर भारताने व्यक्त केलेली नाराजी आणि अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाला भारताने व्हिसा नाकारल्याने दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कटुता आल्याची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘भारत आणि अमेरिका यांच्यात मधुर आणि मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत. विशेष करून मोदी सरकारशी अमेरिकेचे संबंध चांगले आहेत’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.
भारत-अमेरिका संबंधांमध्ये अनेक समान मुद्दे, समान आव्हाने, समान धोके आहेत आणि दोन्ही देशातील लोकांना त्यांचा सामना करावा लागतो. मोदी सरकारशी आमचे अत्यंत चांगले, प्रामाणिक आणि निर्णायक संबंध असून, यापुढेही ते असेच कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. किंबहुना संबंध अधिक सुदृढ करण्याचाच आमचा प्रयत्न आहे, असेही किर्बी म्हणाले.
भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी याच आठवड्यात अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन आणि इतर सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी अनेक द्विपक्षीय, विभागीय आणि आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक मुद्यांवर चर्चा झाली, असेही किर्बी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27204

Posted by on Mar 10 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (709 of 2458 articles)


नेपीदाव, [१० मार्च] - म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या पक्षाने की यांचा निकटचा सहकारी व माजी चालकाला ...

×