Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-अरब अमिरातमध्ये होणार १६ करार

भारत-अरब अमिरातमध्ये होणार १६ करार

=गुंतवणूक आणि दहशतवाद रोखण्यास प्राधान्य=
india uae flagनवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] – अबुधाबीचे राजे शेख मोहंमद बिन झायद अल् नाहायन् हे येत्या बुधवारी भारत दौर्‍यावर येणार असून, यावेळी अणुऊर्जा, तेल, माहिती तंत्रज्ञान, अंतरिक्ष, रेल्वे आणि संयुक्त अरब अमिरातद्वारे भारतात काही कोटी डॉलर्सची गुंतवणूक आदी मुद्यांवर सुमारे १६ करार केले जाणार असल्याची शक्यता अधिकृत सूत्राने वर्तवली आहे.
त्याचबरोबर गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान पुरोगामी तत्वप्रणाली अंगिकारणे, दहशतवादावर आळा घालण्याकरिता सहकार्य आणि अत्यंत जहाल असलेल्या इसिसशी लढा देण्याबाबत अबुधाबीचे राजे प्रामुख्याने चर्चा करतील, अशी माहिती संयुक्त अरब अमिरातचे राजदूत अहमद अल बन्ना यांनी दिली.
सहा महिन्यांपूर्वी संयुक्त अरब अमिरातला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली होती. त्यानंतर आता होणार्‍या तीन दिवसांच्या भेटी अंतर्गत मुख्यत्वाने गुंतवणुकीचा विषय हाताळला जाणार आहे. अमिरातची राजधानी अबुधाबीकडे तब्बल ८०० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका सार्वभौम संपत्ती निधी आहे. त्यामुळे भारतामध्ये अबुधाबीने गुंतवणूक केल्यास भारताकरिता ते अत्यंत फायदेशीर ठरेल. त्यादृष्टीने काही घोषणा या भेटीदरम्यान होण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26795

Posted by on Feb 9 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (840 of 2453 articles)


=उज्ज्वल निकम यांची माहिती= मुंबई, ८ [फेब्रुवारी] - लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड हेडलीला जम्मू-काश्मिरात सक्रिय होऊन ...

×