Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारत एनएसजीत आल्यास आशिया अशांत होईल

भारत एनएसजीत आल्यास आशिया अशांत होईल

=चीनचा कांगावा=
india-china-usपेचिंग, [१६ जून] -एकीकडे भारत ‘एनएसजी’त प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चीनने चांगलाच खटाटोप सुरू केला आहे. ‘‘भारताला एनएसजीमध्ये प्रवेश दिल्यास भारत व पाकिस्तानमधील आण्विक समतोल बिघडून आशियात अशांतता निर्माण होईल’ असा कांगावा चीनने करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इतर देशांशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे जगातील अनेक देश भारताच्या बाजूने उभे राहात आहेत. यामुळे जगातील ४८ देशांच्या समावेश असलेल्या ‘एनएसजी’ मध्ये प्रवेश मिळविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. मात्र, यामुळे चीन अस्वस्थ होत असून भारताला ‘एनएसजी’त प्रवेश मिळावा नाही यासाठी खोडा घालत आहे. चीनचं अधिकृत सरकारी वृत्तपत्रात या संदर्भात एक लेख छापून आला. त्यात चीनने लिहिले आहे की, ‘नियमांच्या अधीन राहून भारताला एनएसजीमध्ये प्रवेश देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, नियम डावलून भारत एनएसजीमध्ये आला तर आशियावर अस्थिरतेचं संकट येईल,’ अशी भीती लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
भारताला एनएसजीत प्रवेश मिळाल्यानंतर भारत सर्वमान्य आण्विक शक्ती म्हणून गणली जाईल. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारताला आण्विक इंधन व साधनसामुग्री सहज मिळवता येईल. याचा उपयोग लष्करी उद्देशांसाठीही केला जाईल. मात्र, यात पाकिस्तान मागे पडेल आणि आशियातील सत्ता समतोलाच्या दृष्टिने हे घातक आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या दबावानंतर न्यूझीलंडने आपल्या धोरणात नरमाई दाखवत भारताला एनएसजीत प्रवेश मिळण्यासाठी पाठिंबा देण्याचे ठरविले असे वृत्त कळले आहे.
व्हिएन्नात मागच्या महिन्यात झालेल्या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. भारताने एनपीटीवर स्वाक्षरी केली नसल्याने तुर्कस्तानसह न्यूझिलंड, ऑस्ट्रिया, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे भारतविरोधी भूमिका घेऊन असल्याचे आधी बोलले गेले. पण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सर्व एनएसजीच्या सदस्य देशांना पत्र लिहून भारताला विरोध न करण्याबाबत सूचवल्यावर न्यूझिलंड व ऑस्ट्रिया यांनी आपल्या नकारात्मक धोरणात थोडी नरमाई आणल्याचे दिसून आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28621

Posted by on Jun 16 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (231 of 2458 articles)


=ईशरत प्रकरणी समितीचा निष्कर्ष= नवी दिल्ली, [१५ जून] - लष्कर-ए-तोयबाची महिला बॉम्ब बनलेल्या ईशरत जहॉं प्रकरणाशी संबंधित फाईल्स सप्टेंबर २००९ ...

×