Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारत-पाकसाठी चर्चा हाच पर्याय

भारत-पाकसाठी चर्चा हाच पर्याय

=बान की मून यांची भूमिका=
UN SECRETARY GENERAL MEETS WITH SPANISH PRESIDENTसंयुक्त राष्ट्रसंघ, [२९ नोव्हेंबर] – भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुरळीत झाल्यास केवळ या दोन देशांमध्येच नव्हे, तर संपूर्ण आशिया उपखंडात शांतता आणि स्थिरता निर्माण होईल. दहशतवादामुळे दोन्ही देशांपुढे आव्हान उभे ठाकले असल्याने, संबंध सुरळीत करण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग आहे, अशी भूमिका संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी विशद केली.
भारत आणि पाकमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून कितीही मतभेद असले, तरी ती चर्चेच्या माध्यमातूनच सोडविली जाऊ शकतात. दोन्ही देशांच्या प्रमुखांना चर्चेच्या टेबलवर आणण्यासाठी मी सातत्याने प्रोत्साहित केले आहे, असे बान की मून यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, शनिवारीच पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतासोबत कोणत्याही पूर्वअटीशिवाय चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे मत व्यक्त केले होते.
सीमाभागात आणि देशाच्या कोणत्याही भागात होणारी घटना हाताळताना दोन्ही देशांनी संयम बाळगावा, असे आवाहन मी अनेकदा जाहीरपणे केले आहे. आता ही वेळ आपसात भांडण्याची नाही, तर सर्व मतभेदांवर तोडगा काढून दहशतवादविरोधी लढ्यासाठी एकत्र येण्याची आहे. भारत आणि पाकमधील संबंध सुधारल्यास दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित होऊन दहशतवादविरोधी लढादेखील आणखी बळकट होऊ शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25825

Posted by on Nov 29 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1127 of 2458 articles)


=भाजपा मुख्यालयात ‘दिवाळी मिलन’, पत्रकारांसोबत काढल्या सेल्फी= नवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] - भाजपा मुख्यालयात आज शनिवारी ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रम थाटात ...

×