Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भारत माता की जय म्हणणार नाही : ओवैसी

भारत माता की जय म्हणणार नाही : ओवैसी

Hyderabad MP Asaduddin Owaisiलातूर, [१४ मार्च] – विविध कारणांवरून नेहमीच चर्चेत राहणारे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित एका सभेत बोलताना ओवैसी यांनी ‘भारत माता की जय’ म्हणायला चक्क नकार दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काही दिवसांपूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आजकालच्या मुलांना भारत माता की जय बोला, हे शिकवावे लागते, असे म्हटले होते. तो धागा पकडून ओवैसी यांनी त्या विरोधात बोलताना, मी जरी भारतात राहत असलो, तरी भारत माता की जय, असे म्हणणार नाही. कारण घटनेत किंवा कुठल्याही कायद्यामध्ये भारत माता की जय अशी घोषणा लिहिलेली नाही. त्यामुळे कोणी माझ्या गळ्यावर धारदार सुरी जरी ठेवली तरी अशी घोषणा मी देणार नाही, असे स्पष्टपणे त्यांनी जाहीर केले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकार करणार चौकशी
उदगीरमधील ओवैसी यांच्या विधानाची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यांच्या वक्तव्यात जर काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांना कडक शिक्षा केली जाईल, असेही सांगण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27314

Posted by on Mar 15 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (661 of 2453 articles)


=ब्रिटिश नागरिकत्वाचा मुद्दा= नवी दिल्ली, [१४ मार्च] - ब्रिटिश नागरिकत्वाच्या मुद्यावरून लोकसभेच्या नैतिकता (इथिक्स) समितीने आज सोमवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल ...

×