Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » मनमोहनसिंग सुप्रीम कोर्टात जाणार

मनमोहनसिंग सुप्रीम कोर्टात जाणार

=कोळसा घोटाळा=
ManmohanSinghनवी दिल्ली, [२० मार्च] – लाखो कोटींच्या कोळणा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आरोपी म्हणून हजर राहण्याचा समन्स बजावल्यानंतर, या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी घेतला आहे. पुढील आठवड्यात ते याबाबतची याचिका दाखल करणार आहेत.
माजी विधि मंत्री आणि प्रख्यात कायदेपंडित कपिल सिब्बल व के. टी. एस. तुलसी हे दोघेही मनमोहनसिंग यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. गेल्या ११ मार्च रोजी सीबीआय न्यायालयाने मनमोहनसिंग यांच्यासोबतच प्रख्यात उद्योगपती कुमारमंगलम् बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्यासह पाच जणांना आरोपी म्हणून हजर होण्यासाठी समन्स जारी केला होता.
मनमोहनसिंग आणि इतर आरोपींविरुद्ध विश्‍वासघात प्रकरणी खटला चालविण्यात यावा, असे स्पष्ट करताना न्यायालयाने आपल्या ७५ पानांच्या आदेशात म्हटले होते की, कोळसा मंत्रालयाची जबाबदारी मनमोहनसिंग यांच्याकडे असताना त्यांनी बिर्ला यांना फायदा होईल, असेच निर्णय घेतले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21619

Posted by on Mar 21 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1868 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१९ मार्च] - भाजपाप्रणीत रालोआ सरकारने लोकसभेत पारित केलेल्या शेतकरी हिताच्या भूमी संपादन विधेयकाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न ...

×