Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » मुंबई विमानतळ उडविण्याची धमकी

मुंबई विमानतळ उडविण्याची धमकी

=अतिरेकी हल्ल्याचा इशारा=
mumbai_airportमुंबई, [१६ जानेवारी] – प्रजासत्ताक दिन येत्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवसाची देशात सर्व ठिकाणी जोरात तयारी सुरू असतानाच मुंबईतल्या ‘डोमॅस्टिक एअरपोर्ट’ला ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी हे विमानतळ उडवून देण्याचा लिखीत इशारा दिला आहे.
डोमेस्टिक एअरपोर्टच्या टॉयलेटमध्ये आयएसआयएसच्या नावाने २६ जानेवारीच्या दिवशी विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आंतर्देशीय विमानतळातल्या ‘ए वन टर्मिनल’ मधल्या दोन्ही पुरूष शौचालयांत गुरूवारी संध्याकाळी हा धमकीचा इशारा लिहिलेला आढळला. याआधीही अशाच प्रकारचा धमकीवजा इशार ‘इसिस’च्या नावाने ६ जानेवारीला आढळला होता. त्यात दहा जानेवारीला विमानतळ उडविण्याची धमकी दिली गेली होती.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसांच्या भारत दौर्‍यासाठी २५ जानेवारीला भारतात येत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयासाठी प्रमुख अतिथी म्हणून ओबामा हजर राहणार आहेत. त्यामुळे ओबामांच्या दौर्‍यावेळी भारतात हल्ला करून दहशत माजविण्याचा या अतिरेक्यांचा प्रयत्न असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. या धमकीनंतर विमानतळाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19777

Posted by on Jan 17 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (2217 of 2452 articles)


=किरण बेदींचे प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] - माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या पाठोपाठ आम आदमी ...

×