Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » मुख्यमंत्री कार्यालय विशेष कार्यकारी अधिकारीपदी श्रीकांत भारतीय

मुख्यमंत्री कार्यालय विशेष कार्यकारी अधिकारीपदी श्रीकांत भारतीय

shrikant bhartiya1पिंपरी, [२९ सप्टेंबर] – भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापनातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत भारतीय यांची मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारीपदी (ओएसडी) नेमणूक झाली आहे. त्यामुळे ‘टीम देवेंद्र’ला अधिकच बळकटी मिळाली आहे.
अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले भारतीय मूळचे विदर्भातील आहेत. त्यांनी काही काळ दैनिक तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणूनही काम केले आहे. उत्तम वक्ते तसेच उत्तम व्यवस्थापन कौशल्यासाठी ते भाजपमध्ये ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ विभागाचे संघटनमंत्री, भाजयुमोचे महाराष्ट्र संघटनमंत्री, भाजपाचे पुणे विभागाचे संघटनमंत्री, २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूक व्यवस्थापन प्रमुख म्हणून काम पाहिलेे आहे. भाजपच्या पं. दीनदयाल प्रशिक्षण महाअभियानाचे प्रदेश प्रमुख म्हणूनही ते सध्या काम पाहत आहेत.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, गेली २५ वर्षे भाजपाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करत असताना संघटनेने दिलेला आदेश मी महत्त्वाचा मानतो. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पेलण्यास मी सक्षम आहे. पक्षाने दिलेले काम झोकून देऊन करण्याचा आपला स्वभाव आहे. आपल्याला दिलेल्या नवीन जबाबदारीला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. जनता आणि शासन यांच्यातील दुवा बनून काम करू, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24121

Posted by on Sep 30 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1389 of 2451 articles)


माझे सरकार भ्रष्टाचारमुक्त राजकारण्यांच्या मुली, जावयाने केली हजारो कोटींची कमाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंगे्रसवर अप्रत्यक्ष हल्ला सॅन जोस, ...

×