Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मृत गायी-म्हशीच्या पोटात आढळते ३० किलो प्लॅस्टिक

मृत गायी-म्हशीच्या पोटात आढळते ३० किलो प्लॅस्टिक

=प्रकाश जावडेकर यांची धक्कादायक माहिती=
prakash javedkarहैदराबाद, [२८ मार्च] – भारतात मृत्युमुखी पडलेली प्रत्येक गाय किंवा म्हशीच्या पोटात किमान ३० किलो प्लॅॅस्टीक आढळून येते, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज शनिवारी येथे दिली. ‘प्लॅस्टिक कॅरीबॅग मुक्त भारत’ हे अभियान लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
आपल्या देशातील समस्या अशी आहे की, आपल्याकडे कायदे तर खूप आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही, असे जावडेकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. ४० मायक्रॉनपेक्षा कमी वजनांच्या प्लॅस्टिक बॅगवर बंदी आहे. त्या प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया होऊ शकत नसल्याने उपयोग संपल्यानंतर या पिशव्या कुठेही फेकून दिल्या जातात. देशात दररोज १५ हजार टन इतक्या प्लॅस्टिक पिशव्या फेकल्या जातात आणि त्यातील केवळ ९ हजार टन पिशव्याच उचलल्या जातात. त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे केवळ प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा ढिग जमा दिसतो. गावाखेड्यांमध्ये तर सर्वत्र प्लॅस्टिकचे साम्राज्य दिसते. कार्बन डायऑक्साईडप्रमाणेच या पिशव्या कित्येक वर्षांपासून पडलेल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या विखुरलेल्या प्लॅस्टिक पिशव्या गायी, म्हशी खातात. आपल्या देशात दररोज जितक्या गायी आणि म्हशींचा मृत्यू होतो, त्या प्रत्येक प्राण्याच्या पोटात किमान ३० किलो प्लॅस्टिक आढळून येते. ही बाब अतिशय चिंताजनक आहे, असे सांगताना जावडेकर म्हणाले की, ही भीषण स्थिती रोखण्यासाठी आपल्याला प्लॅस्टिक कॅरी बॅग मुक्त भारत अभियान राबविण्यासह कडक कायदा तयार करावा लागणार आहे आणि कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद त्यात करावी लागणार आहे. प्लॅस्टिक पिशव्यांची बेकायदेशीरपणे निर्मिती करणार्‍या कंपन्यांविरोधात अधूनमधून धाडसत्रही राबवावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21799

Posted by on Mar 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1834 of 2453 articles)


आग्रा, [२८ मार्च] - भाजपाचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने ...

×