Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मोदींच्या सूटची ४.३१ कोटींना विक्री

मोदींच्या सूटची ४.३१ कोटींना विक्री

=अंतिम दिवशी बोलीने गाठला उच्चांक=
Modi pinstripe suit on auctionसूरत, [२० फेब्रुवारी] – राजकीय विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘बंदगळा’ सुटला आज शुक्रवारी येथील लिलावात तब्बल ४.३१ कोटी रुपयांना विक्री करण्यात आली. शुक्रवार लिलावाचा अंतिम दिवस असल्याने मोदी यांचा हा सूट खरेदी करण्यासाठी खरेदीदारांमध्ये जणू स्पर्धाच सुरू होती. सूरत येथील हिर्‍यांचे व्यापारी लालजी पटेल यांनी ४.३१ कोटी रुपये मोजून हा सूट खरेदी केला. मोनोग्राम असलेल्या आणि नरेंद्र दामोधरदास मोदी असे नाव एम्ब्रॉयडरी केलेल्या या निळ्या रंगाच्या सूटसाठी तीन दिवसांपूर्वी ११ लाखांच्या बोलीपासून सुरुवात झाली होती. शुक्रवारी सकाळी हा भाव २.३१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर बोली सातत्याने वाढतच गेली. सायंकाळी पाच वाजता लालजी पटेल यांनी ४.३१ कोटी रुपयांची बोली लावली. त्यानंतर लिलावाची मुदत संपल्याने मोदी यांचा हा विशेष सूट पटेल यांना देण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गेल्या महिन्यात भारत भेटीवर आले असता, २५ जानेवारी रोजी मोदी यांनी ओबामांसोबतच्या भेटीत हाच सूट परिधान केला होता. या महागड्या सूटवरून राजकीय विरोधकांनी प्रचंड वादळ उठविले होते. यानंतर मोदी यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव जाहीर केला होता. त्यात हा सूटही ठेवण्यात आला होता.
देशाकरिता काही तरी करावे, असे मला नेहमीच वाटते. आज मला ती संधी मिळाली आहे. माझा हा पैसा राष्ट्राच्या कल्याणासाठीच खर्च होणार आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांचा हा अमूल्य सूट मला मिळाला, याचाही मला खूप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20791

Posted by on Feb 21 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2034 of 2453 articles)


=पंकजा मुंडे यांचे निर्देश= मुंबई, [२० फेब्रुवारी] - शालेय पटपडताळणीच्या धर्तीवर राज्यातील बालगृहांची त्रयस्थ यंत्रणेकडून पटपडताळणी करण्यात यावी, तसेच बालगृहांचे ...

×