Home » क्रीडा, ठळक बातम्या » रवि शास्त्रींकडे संचालकपद

रवि शास्त्रींकडे संचालकपद

=बीसीसीआय खडबडून जागी झाली,=
नवी दिल्ली, [१९ ऑगस्ट] – इंग्लंड दौर्‍यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-३ ने सपाटून मार सहन करणार्‍या भारतीय संघाला आता एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत प्रभावी कामगिरी बजावता यावी यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले असून भारताचे माजी कर्णधार व समालोचक रवि शास्त्री यांच्याकडे संचालकपद बहाल करण्यात आले आहे. यासोबतच संघाचे मुख्य प्रशिक्षक डन्कन फ्लेचर यांनी तातडीने रवि शास्त्री यांची भेट घ्यावी असेही फ्लेचर यांना कळविण्यात आले आहे.
लॉडर्‌‌स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर महेन्द्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखालील युवा संघाला पुढच्या कसोटीत सलग पराभवाचे जबरदस्त धक्केच सहन करावे लागले. तीन दिवसात भारताचा संघ गारद झाल्याने चहूकडून टीकास्त्र सुरू झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळही खडबडून जागी झाली. त्यांनी तातडीने निर्णय घेत संघ व्यवस्थापनात मोठे बदल केले.
भारताचे माजी कर्णधार रवि शास्त्री यांच्याकडे संचालकपद बहाल करण्यात आले. यासोबतच संजय बांगर व भरत अरुण यांची सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णयही झाला. या बदलाकडे बघता धोनी याचेही कर्णधारपद धोक्यात आल्याचे जाणवते.
संघाचे मुख्य प्रशिक्षक डन्कन फ्लेचर यांनाही यापुढे रवि शास्त्री यांच्या संपर्कात रहावे लागणार आहे. भारत-इंग्लंड संघात एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=15053

Posted by on Aug 20 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2381 of 2455 articles)


मुंबई, [८ ऑगस्ट] - रिलायंस इंडस्ट्रिजची नविन पिढी व्यवसायात दाखल होत आहे. रिलायंस इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा ...

×