Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » राज्य सरकारच्या अहवालानंतर शेतकर्‍यांना मदत: राधामोहनसिंह

राज्य सरकारच्या अहवालानंतर शेतकर्‍यांना मदत: राधामोहनसिंह

=अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान=
Radha-Mohan-Singhनवी दिल्ली, [१४ मार्च] – देशाच्या विविध भागात अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकारचा अहवाल आल्यानंतर शेतकर्‍यांना आर्थिक मदत केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी आज सोमवारी लोकसभेत केली.
देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. हा मुद्दा आज सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी स्थगनप्रस्तावाद्वारे उपस्थित केला. मात्र त्याला सभापती सुमित्रा महाजन यांनी अनुमती नाकारली. शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करा, अशी सूचना महाजन यांनी केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनीही खडगे यांना पाठिंबा देत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांशी संबंधित हा प्रश्‍न असल्यामुळे दोन मिनिटात तुमचे म्हणणे मांडा, असे महाजन यांनी सांगितले. जयप्रकाश नारायण यादव यांनीही या मुद्यावर स्थगनप्रस्ताव दिला होता.
राहुल गांधीही या मुद्यावर बोलायला उभे झाले. उत्तर भारतात अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे या नुकसानीची पााहणी करण्यासाठी संबंधित राज्यात केंद्रीय चमू पाठविण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. याआधीही अतिवृष्टी आणि गारपीट झाली, तेव्हा शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तसे यावेळी होऊ नये, असे गांधी म्हणाले. याबाबत कृषिमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसात झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येताच सरकार कामाला लागले आहे. नुकसान झालेल्या राज्यातील कृषिमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. कृषिमंत्री राधामोहनसिंह या संदर्भात निवेदन करतील, असे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. त्यानुसार राधामोहनसिंह यांनी अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्यांकडून अहवाल मागविण्यात आल्याचे सांगितले. असा अहवाल आल्यानंतर शेतकर्‍यांना आर्थिक मदत दिली जाईल, तसेच या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय चमूही त्या राज्यात पाठविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27307

Posted by on Mar 15 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (664 of 2453 articles)


ग्रॅण्ड बस्सम, [१४ मार्च] - आयव्हरी कोस्टच्या ग्रॅण्ड बस्सम किनार्‍यावरील एका रिसॉर्टवर दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात १६ नागरिकांचा मृत्यू झाला ...

×