Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » रामजन्मभूमी वाद: वृद्ध पक्षकाराचे निधन

रामजन्मभूमी वाद: वृद्ध पक्षकाराचे निधन

praposed shri ram mandir ayodhyaअयोध्या, [२५ डिसेंबर] – अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादातील सर्वात वयोवृद्ध पक्षकार मोहम्मद फारुक यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची मूर्ती परिसरात बसविण्यासंबंधी १९४९ साली दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील पक्षकार असलेल्या सहा मुस्लिमांपैकी फारुक एक होते.
मोहम्मद फारुक यांचे बुधवारी निधन झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा मोहम्मद सलीम हा या प्रकरणात पक्षकार म्हणून समाविष्ट होण्याची शक्यता आहे, असे उत्तरप्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता व बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक झफरयाब जिलानी यांनी सांगितले. फारुक यांचे वडील मोहम्मद झाहूर हे या प्रकरणातील एक मूळ तक्रारकर्ते होते. आता उरलेल्या पक्षकारांमध्ये अर्शद रशदी, हाशिम अन्सारी, मौलाना महफूझुरूर रहमान, मुफ्ती हिसबुल्ला, माहमूद आणि सुन्नी सेंट्रल वफ्क बोर्ड यांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19294

Posted by on Dec 26 2014. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2302 of 2452 articles)


कोट्टायम, [२५ डिसेंबर] - विश्‍व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने देशात सुरू असलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांतर्गत केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील दोन मंदिरांमध्ये ५८ ...

×