Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » रेल्वेभाड्यात घट नाही : सिन्हा

रेल्वेभाड्यात घट नाही : सिन्हा

Minister-of-State-for-Railways-Manoj-Sinha2बरेली, [१९ फेब्रुवारी] – आगामी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे भाड्यात घट करण्याचे प्रयोजन नसल्याचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे. एका खाजगी कार्यक्रमासाठी बरेलीत आलेल्या सिन्हा यांनी पत्रकारांशी चर्चा करताना ही माहिती दिली.
‘सध्या आकारण्यात येत असलेले रेल्वे भाडे किमान असून प्रवाशांना अनुदानही देण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या गरजा जास्त आणि स्रोत कमी आहेत. त्यादृष्टीने रेल्वे अर्थसंकल्प संतुलित आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करण्यात येईल,’ असे सिन्हा यांनी स्पष्ट केले. रेल्वेकडे स्वत:चे पोलिस दल असले तरी आपल्या क्षेत्रातील गुन्ह्यांविरोधात खटला दाखल करण्याचा त्यांना अधिकार नाही. संसदेत संशोधन विधेयक मांडून रेल्वे सुरक्षा दलालाही खटला दाखल करण्याचा अधिकार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘त्यासाठी राज्यांच्या पोलिस अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. शिवाय, या दलात दहा टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
‘रेल्वेत १०० टक्के थेट परराष्ट्रीय गुंतवणुकीचा निर्णय कोणत्याही स्थितीत अंमलात आणला जाईल. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशातील रेल्वेमार्गांमध्ये दोन टक्केच वाढ झाली आहे. त्या तुलनेत रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या संख्येत मात्र कित्येक पटींनी वाढ झाली. त्यामुळे देशात २० हजार किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार असून १० हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20740

Posted by on Feb 20 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2039 of 2453 articles)


=संरक्षण मंत्री पर्रिकर यांचे मत= बंगळुरू, [१९ फेब्रुवारी] - संरक्षण क्षेत्रातील विद्यमान खरेदी प्रक्रिया क्लिष्ट व कठीण असून, त्यात सहजता ...

×