Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रोज १ लाख किलो डाळीचा पुरवठा करू, पण

रोज १ लाख किलो डाळीचा पुरवठा करू, पण

=आयातदारांनी ठेवली केंद्रापुढे अट=
toor-dal-poteनवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – सध्या तूर डाळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने केंद्राने डाळींच्या साठ्याची मर्यादा निश्‍चित केली असताना, आयातदारांनी मात्र १३५ रुपये किलो या दराने दररोज एक लाख किलो डाळीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवितानाच, साठा मर्यादेतून आम्हाला सूट देण्यात यावी, अशी अट घातली आहे.
डाळींच्या किमती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारने डाळीचा काळाबाजार रोखण्यासाठी आयातदार, निर्यातदार, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि परवानाप्राप्त अन्न प्रक्रिया कंपन्यांना साठा मर्यादेच्या बंधनात बांधले. या मुद्यावर बुधवारी रात्री मंत्रिगटाची बैठक झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी डाळींच्या आयातदारांची भेट घेऊन जागतिक बाजारपेठांमधून डाळ प्राप्त करण्यात येणार्‍या समस्या जाणून घेतल्या. तेव्हा, आयातीत डाळींचा पुरवठा वाढला, तर डाळींच्या किमती कमी होतील आणि त्यासाठी केंद्राने आयातदारांना साठा मर्यादेच्या बंधनातून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली असल्याचे मुंबईस्थित डाळी व अन्नधान्य संघटनेचे अध्यक्ष प्रवीण डोंगरे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जानेवारीपर्यंत २५ लाख टन डाळीचा पुरवठा करण्यासाठी निर्यातदारांसोबत करार झालेला आहे आणि सुमारे अडीच लाख टन डाळीचा साठा देशातील विविध बंदरांवर अडकलेला आहे. अशा स्थितीत साठ्याच्या निर्बंधातून काहीच साध्य होणार नाही, असे आम्ही अर्थमंत्र्यांना स्पष्ट केले असल्याचे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25267

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1299 of 2453 articles)


राजनाथसिंह यांचा सल्ला किरन रिजिजू, व्ही. के. सिन्हा यांना दिली समज नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] - आपल्या विधानांनी चर्चेत ...

×