Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्‍न सोडवा

लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्‍न सोडवा

=मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश=
Devendra-Fadnavis3मुंबई, [५ ऑक्टोबर] – लोकशाही दिनात तक्रार केल्यानंतरच सामान्य नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावायचे का? असा सवाल करीत लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्‍न सोडवले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी दिले.
मंत्रालयात सकाळी झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव यावेळी उपस्थित होते. लोकशाही दिनात जमिनीबाबतचे देयक न मिळाल्याबाबत रायगड येथील उदयकुमार चंदने यांनी तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीवर चर्चा सुरू असतानाच तक्रारदारांना लोकशाही दिनातच त्वरित पेमेंट दिल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. अशा स्वरूपाचा अनुभव अन्य ठिकाणच्या तक्रारदारांनी सांगितल्यावर, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही दिनात तक्रार दाखल केल्यावरच प्रशासनाने त्याची दखल घ्यायची का? लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावले पाहिजे. मूळातच नागरिकांना लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्याची गरजच भासता कामा नये.
राज्यात सेवा हमी कायदा लागू करण्यात आला आहे. त्याच बरोबर या कायद्यातील काही सेवा आता सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवा विहित कालावधीत देण्याचे बंधनकारक असल्याने क्षेत्रिय अधिकार्‍यांनी या कायद्यानुसार कारवाई करावी आणि सामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय द्यावा. कामात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बर्‍याच जिल्ह्यात पैसे भरूनही वीज जोडणीची प्रकरणे (पेड पेंडींग) प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. जे कंत्राटदार विहीत मुदतीत कामे पूर्ण करीत नाहीत, त्यांना काळ्या यादीत टाका. मार्च २०१६ पर्यंत एकही पेड पेंडीगचे प्रकरण शिल्लक राहता कामा नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सोमवारी झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये कोल्हापूर, भंडारा, अकोला, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. यात बर्‍याचशा समस्या निकाली निघाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24154

Posted by on Oct 6 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1378 of 2451 articles)


=वरिष्ठ मंत्र्यांचे शिष्टमंडळही येणार= बर्लिन, [३ ऑक्टोबर] - जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मार्केल यांचे उद्या रविवारी भारत भेटीवर आगमन होत आहे. ...

×