Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » विकासाचे दुसरे नाव भारत

विकासाचे दुसरे नाव भारत

=आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिली पावती=
christine-lagarde-imfअंकारा, [५ सप्टेंबर] – ‘जी-२०’ राष्ट्रसमुहाच्या अर्थमंत्र्यांची बैठक तुर्कीच्या अंकारा येथे सुरू झाली. या बैठकीत बोलताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तीन लगार्ड यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर स्तूतीसूमनांचा वर्षाव करताना, विकासाचे दुसरे नाव म्हणजे भारतच असल्याचे गौरवोद्‌गार काढले.
चीनमधील आर्थिक संकटाने जगभरातील बाजारावर मंदीचे सावट पसरले आहे. पण, भारतीय अर्थव्यवस्था या स्थितीतही विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. जागतिक मंदीवर मात करून जगातील जे निवडक देश प्रगती करीत आहेत, त्यात भारताचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक धोरणांमधील अनिश्‍चिततेच्या मुद्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विकसित देशांमध्येही सध्या आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तिथेच, विकासाच्या मार्गावर गतीने प्रगती करीत असलेल्या देशांमध्ये भारताने नेत्रदीपक अशीच कामगिरी केली आहे, असे त्या म्हणाल्या.
या बैठकीत अरुण जेटली यांच्यासोबतच दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, चीन आणि अमेरिकेसह अन्य देशांचे अर्थमंत्रीही उपस्थित होते. याच बैठकीत चीनने, आपली अर्थव्यवस्था कोसळणार नाही. विद्यमान संकटातून ती हळूहळू बाहेर येईल, अशी हमी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23716

Posted by on Sep 6 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1505 of 2458 articles)


नवी दिल्ली, [५ सप्टेंबर] - आज शिक्षक दिन सर्वत्र साजरा होत आहे. जगातील प्रसिद्ध सर्ज इंजिन असलेल्या गुगलने शिक्षकदिनानिमित्त डुडलवर ...

×