Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » विस्तारवाद भारताची महत्त्वाकांक्षा नाही

विस्तारवाद भारताची महत्त्वाकांक्षा नाही

=शेजार्‍यांसोबत चांगल्या संबंधांची अपेक्षा : राजनाथसिंह=
RAJNATH SINGHसांबा, [२१ सप्टेंबर] – भारत हा विस्तारवादी महत्त्वाकांक्षा बाळगणारा देश नाही, असे स्पष्ट करताना, पाकिस्तान आणि चीनसह शेजारील सर्वच देशांसोबत चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे, तसेच सीमाप्रश्‍न व दहशतवादाशी संबंधित सर्वच समस्यांवर चर्चेतून तोडगा निघावा, अशी भारताची नेहमीच भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी येथे केले.
राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या आपल्या तीन दिवसांच्या दौर्‍याचा प्रारंभ सांबा जिल्ह्यातून केला. आपल्या सीमांचे रक्षण करण्याचीच भारताची महत्त्वाकांक्षा आहे. आमच्या सीमेत कुणीही घुसखोरी किंवा आक्रमण केलेले कदापि मान्य केले जाणार नाही. शेजारील देशांनी हा प्रकार कायमचा थांबवायलाच हवा. कितीही मतभेद असले, तरी शेजारील देशांसोबतचे संबंध सुधारण्याच्या दिशेने पुढाकार घेण्याची आमची तयारी आहे. पण, देशवासीयांचा सन्मान आणि प्रतिष्ठेशी तडजोड कदापि करू शकत नाही, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. भारत-चीन सीमेचे रक्षण करणार्‍या इंडो-तिबेट सीमा पोलिस अधिकारी व जवानांना एका कार्यक्रमात संबोधित करताना गृहमंत्री बोलत होते.
पाकिस्तान आणि चीनसोबत आम्हाला चांगले संबंध हवे आहेत. हे दोन्ही देश भारतासोबत जोपर्यंत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार नाही, तोपर्यंत आशियात आणि उपखंडात शांतता प्रस्थापित होणे शक्य नाही. सीमा प्रश्‍न असो वा दहशतवादाचा मुद्दा असो, मला असे प्रामाणिकपणे वाटते की, या सर्वच मुद्यांवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणे सहज शक्य आहे. भारत हा शांतताप्रिय देश आहे आणि केवळ आपल्या सीमांचे रक्षण करणे, यावरच आमचे लक्ष केंद्रित असते, असे त्यांनी सांगितले.
आपल्या सीमांचा विस्तार व्हावा, अशी महत्त्वाकांक्षा भारताने आजवर कधीच जोपासली नाही. आजही आमची तशी इच्छा नाही आणि भविष्यातही कधी राहणार नाही. याचे एकमेव कारण असे आहे की, जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव असा देश आहे, जिथे साधू-संत केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील सर्वच नागरिकांना आपले समजतात. ‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात संपूर्ण पृथ्वीच आमचे कुटुंब आहे, हा संदेश याच भावनेतून आम्ही जगाला दिला आहे आणि यातूनच आम्ही सर्वच देशांसोबत चांगल्या संबंधांची अपेक्षा करीत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, येथे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, भारताचे शेजारील सर्वच देशांसोबत मैत्रीचे संबंध राहावे, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे. पाकिस्तानचे सैनिक सीमेवर वारंवार गोळीबार करीत असतात. या स्थितीतही चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकने समोर यावे, हिंसाचार थांबवावा, दोन पावले समोर येण्याची आमचीही तयारी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23993

Posted by on Sep 22 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1426 of 2453 articles)


=स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्याचे आदेश= मुंबई, [२१ सप्टेंबर] - गेल्या काही दिवसात राज्याच्या सर्व भागात होत असलेल्या दमदार पावसामुळे ...

×