Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वेळ वाचविण्यासाठी मोदी विमानातच झोप घेतात

वेळ वाचविण्यासाठी मोदी विमानातच झोप घेतात

NARENDRA MODI39नवी दिल्ली, [९ एप्रिल] – वेळेचा सदूपयोग कसा करावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकावा. नरेंद्र मोदी हे जेव्हा विदेशी दौर्‍यावर असतात तेव्हा काटेकोरपणे वेळेची बचत करण्यावर प्राधान्य देतात. त्यासाठी ते रात्री विमानप्रवास करून प्रवासादरम्यान आपली झोप पूर्ण करतात.
पंतप्रधान मोदी नुकतेच बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेले होते. या दरम्यान त्यांनी तीन रात्री विमानातून प्रवास केला, तर दिवसा त्यांनी या देशांना भेटी देऊन आपले काम पूर्ण करण्यावर भर दिला. वेळ वाचविण्याच्या दृष्टिने नरेंद्र मोदी हे रात्री हॉटेलमध्ये आराम करण्याऐवजी त्याच वेळेत प्रवास करण्यास प्राधान्य देतात आणि विमानातच आपली झोप पूर्ण करतात. दिल्ली ते ब्रसेल्स, ब्रसेल्स ते वॉशिंग्टन डी. सी आणि तेथून रियाधला जाण्यासाठी त्यांनी रात्रीच प्रवास केला.
एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या दौर्‍यात मोदींनी केवळ २ रात्री वॉशिंग्टन व रियाध येथे हॉटेलमध्ये मुक्काम केला. मोदींनी अमेरिकासह विविध देशांचा दौरा केवळ ९७ तासांमध्ये केला. जर त्यांनी रात्री प्रवास करण्याचा निर्णय घेतला नसता तर आम्हाला याच दौर्‍यासाठी किमान ६ दिवस तरी लागले असते.
दरम्यान, आपल्या दोन वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान मोदी यांनी २० दौर्‍यांमध्ये ४० देशांना भेट दिली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27768

Posted by on Apr 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (505 of 2453 articles)


=मुंबईत नववर्ष संकल्प सभा= मुंबई, [८ एप्रिल] - भारताला २१ व्या शतकात प्रगत राष्ट्र म्हणून जगाला मार्गदर्शन करायचे असेल तर ...

×