Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वैमानिक होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले

वैमानिक होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले

APJ-KALAM2नवी दिल्ली, [२८ जुलै] – देशाला अण्वस्त्रसज्ज करण्यात मोलाचे योगदान देणारे आणि ‘मिसाईल मॅन’ अशी ओळख असलेले देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मनात, आपण अणुवैज्ञानिक होऊ, असा विचारही कधी आला नव्हता. वैमानिक व्हायचे आणि आकाशात उंच भरारी घ्यायची, हेच स्वप्न त्यांनी जोपासले होते. या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या ते अतिशय जवळही आले होते. मात्र, भारतीय हवाई दलात त्यावेळी केवळ आठ जागाच रिक्त होत्या आणि मुलाखतीत डॉ. कलाम यांचा नववा क्रमांक होता. त्यामुळे कलाम यांचे वैमानिक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. पायलट होणं शक्य झालं नाही.
‘माय जर्नी : ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन टू ऍक्शन’ या आपल्या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला आहे. मद्रास टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना डॉ. कलाम यांनी भविष्यात आपण केवळ वैमानिकच व्हायचे, हेच स्वप्न जोपासले होते. ‘आकाशात उंच भरारी घ्यायची आणि तिथून मशिन कंट्रोल करावी,’ हेच माझे स्वप्न होते, असे डॉ. कलाम यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
भारतीय हवाई दलात वैमानिक होण्यासाठी त्यांनी आपले सर्वच प्रयत्न पणाला लावले होते. त्यांना दोन ठिकाणांहून मुलाखतीचे निमंत्रणही मिळाले होते. पहिलं निमंत्रण डेहराडूनच्या इंडियन एअरफोर्सकडून, तर दुसरे निमंत्रण दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाच्या तंत्रज्ञान आणि उत्पादन संचालनालयाकडून आले होते, असे नमूद करीत कलाम पुस्तकात लिहितात की, संरक्षण खात्याला मुलाखत देणे शक्य होते. मात्र, संरक्षण मंत्रालयाला उमेदवारांकडून काही विशेष गुणांची अपेक्षा होती. २५ मुलांची निवड झाली होती. त्यात मी नवव्या स्थानावर होतो आणि संरक्षण खात्याकडे केवळ ८ जागा रिक्त होत्या. त्यामुळे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मी अपयशी ठरलो. त्यानंतर मी हृषीकेशला आलोे आणि नव्या दिशेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23554

Posted by on Jul 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1537 of 2453 articles)


=सरसंघचालकांची श्रद्धांजली= नागपूर, [२८ जुलै] - नामवंत वैज्ञानिक, अनेकांना प्रेरणा देणारे व दूरदृष्टी असलेले माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. ...

×